Bollywood Drug Connection | एनसीबी समन्सनंतर गायब अभिनेत्रीची सोशल मीडिया पोस्ट, फरार झाल्याचा दावा फेटाळला!

रिया चक्रवर्ती, दीपिका पदुकोण, सारा अली खाननंतर अभिनेत्री सपना पब्बीला देखील एनसीबीने समन्स (NCB Summons) बजावला होता.

Bollywood Drug Connection | एनसीबी समन्सनंतर गायब अभिनेत्रीची सोशल मीडिया पोस्ट, फरार झाल्याचा दावा फेटाळला!
Harshada Bhirvandekar

|

Oct 23, 2020 | 12:59 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येशी संबंधित ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीनी धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अनेक बड्या कालाकांरांची नावे या प्रकरणात समोर आली आहेत. रिया चक्रवर्ती, दीपिका पदुकोण, सारा अली खाननंतर अभिनेत्री सपना पब्बीला (Sapna Pabbi) देखील एनसीबीने समन्स (NCB Summons) बजावला होता. सपना पब्बी सुशांतच्या ‘ड्राईव्ह’ चित्रपटाची सह अभिनेत्री होती. एनसीबीच्या समन्सनंतर ती फरार झाल्याचे वृत्त समोर येत होते. त्यानंतर खुद्द सपनाने आता सोशल मीडियावर पोस्ट लिहीत याबद्दलचा खुलासा केला आहे.(Bollywood Drug Connection Sapna Pabbi Statement after NCB summons)

एनसीबीने समन्स बजावल्यानंतर सपना पब्बी गायब झाल्याचे बोलले जात होते. ती अचानक देशातूनच नाहीशी झाली होती. त्यामुळे ती फरार झाल्याचे वृत्त सगळीकडे पसरले होते. मात्र, याला वैतागलेल्या अभिनेत्री सपना पब्बीने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत, यावर खुलासा केला आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिने म्हटले की, ‘भारतात माझ्याबाबतीत सुरू असलेल्या चर्चांमुळे मी खूप अस्वस्थ झाले आहे. मी फरार झाले आहे, या अफवेमुळे मला प्रचंड दुःख झाले आहे. मी माझ्या घरी, लंडनला माझ्या परिवाराजवळ परतले आहे. माझ्या वकिलांची अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, मी कुठे आहे हे त्यांना माहित आहे.’(Bollywood Drug Connection Sapna Pabbi Statement after NCB summons)

View this post on Instagram

🙏🏽

A post shared by S a p n a P a b b i (@sapnapabbi_sappers) on

कोण आहे सपना पब्बी?

अभिनेत्री सपना पब्बी ही ब्रिटीश नागरिक असून, अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी ती भारतात आली होती. तिचे संपूर्ण बालपण देखील लंडनमध्येच गेले आहे. सपना नेटफ्लिक्सच्या ‘ड्राईव्ह’ या चित्रपटात सुशांत सिंह राजपूतसोबत झळकली होती. टीव्ही मालिकांमधून करिअरची सुरुवात करणार्‍या सपनाने आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक चित्रपट आणि वेब सीरीजमध्ये काम केले आहे.( Bollywood Drug Connection Sapna Pabbi Statement after NCB summons)

‘घर आजा परदेशी’ या मालिकेत वाईट अभिनय केल्यामुळे सपनाला काढून टाकण्यात आले होते. ‘कसौटी जिंदगी की’मध्ये ‘निवेदिता’ची भूमिका साकारणाऱ्या पूजा बॅनर्जीने तिला रिप्लेस केले होते. यानंतर सापनाने काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ’24’ या मालिकेमधून पुनरागमन केले होते. या मालिकेत तिने अनिल कपूरच्या मुलीची भूमिका साकारली होती.

हर्षवर्धन कपूरशी अफेअरमुळे चर्चेत

सपना पब्बी काही महिन्यांपूर्वी अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरला डेट करत होती. या दोघांची पहिली भेट ‘24’च्या सेटवर झाली होती. सपना आणि हर्षवर्धनमध्ये पहिल्याच भेटीत छान मैत्री झाली होती. दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल मौन राखले होते. मात्र, अनिल कपूरला हे नाते मान्य नसल्याने या दोघांच्या मैत्रीत फूट पडल्याचे म्हटले जाते.

(Bollywood Drug Connection Sapna Pabbi Statement after NCB summons)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें