AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

न्यायमूर्ती दत्ता ड्रायव्हिंग सीटवर, शपथविधीसाठी कोलकाता-मुंबई दोन हजार किमी कारने प्रवास

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून दीपांकर दत्ता उद्या (मंगळवार) शपथ घेणार आहेत. (Bombay High Court Dipankar Datta travels by car from Kolkata)

न्यायमूर्ती दत्ता ड्रायव्हिंग सीटवर, शपथविधीसाठी कोलकाता-मुंबई दोन हजार किमी कारने प्रवास
| Updated on: Apr 27, 2020 | 11:14 AM
Share

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ घेण्यासाठी कोलकाता हायकोर्टाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता रवाना झाले आहेत. लॉकडाऊनमुळे विमान आणि रेल्वे वाहतूक बंद असल्याने कोलकाता ते मुंबई हे दोन हजार किलोमीटरचे अंतर दत्ता यांना कारने प्रवास करुन कापावे लागत आहेत. (Bombay High Court Dipankar Datta travels by car from Kolkata)

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून दीपांकर दत्ता उद्या (मंगळवार) शपथ घेणार आहेत. राजभवनामध्ये उद्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी त्यांना शपथ देतील. उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आज (27 एप्रिल) निवृत्त होत आहेत.

न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि त्यांचा मुलगा आलटून पालटून कार चालवत आहेत. गुगल मॅपनुसार कोलकाता ते मुंबई हे 2 हजार 178 किमी अंतर पार करण्यास 41 तासांचा अवधी लागतो. दीपांकर दत्ता शनिवारी सहकुटुंब कोलकात्याहून निघाले. दोन रात्री विश्रामाचा वेळ आणि सद्यस्थितीत शून्य वाहतूक कोंडीचा विचार करता सोमवारी ते मुंबईत दाखल होण्याची चिन्ह आहेत.

कोण आहेत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता?

न्यायमूर्ती दीपांकर दत्ता गेल्या 14 वर्षांपासून कोलकाता उच्च न्यायालयात कायमस्वरुपी न्यायमूर्ती म्हणून न्यायदानाचे काम करत आहेत. 1989 मध्ये एलएलबीची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी वकिलीला सुरुवात केली. कोलकाता उच्च न्यायालयात त्यांनी अनेक वर्षे वकिली केली.

सर्वोच्च न्यायालय आणि अन्य राज्यांतील न्यायालयांतही त्यांनी राज्यघटना आणि कायद्यांच्या महत्त्वाच्या प्रकरणांत युक्तिवाद मांडले. त्यांनी केंद्र व राज्य सरकारसाठीही काही वर्षे सरकारी वकील म्हणून काम केले आहे. कोलकाता विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विधी कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून त्यांनी काही वर्षे काम केले. 22 जून 2006 पासून ते कोलकाता उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून सेवेत आहेत.

दीपांकर दत्ता हे कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिवंगत सलीलकुमार दत्ता यांचे ते चिरंजीव, तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अमिताव रॉय यांचे मेहुणे आहेत. (Bombay High Court Dipankar Datta travels by car from Kolkata)

न्यायमूर्ती विश्वनाथ समद्दार यांचाही कारने प्रवास

दुसरीकडे, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विश्वनाथ समद्दार यांची मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. त्यांनाही जवळपास दोन हजार किमी प्रवास आपल्या वाहनाने करावा लागला.

न्यायमूर्ती समद्दार शुक्रवारी संध्याकाळी प्रयागराज येथून रवाना झाले. शनिवारी दुपारी 750 किमीचा प्रवास पूर्ण करुन ते आपल्या सरकारी गाडीने कोलकात्याला पोहोचले. तिथे आपल्या खासगी निवासस्थानी विश्रांती घेतल्यानंतर न्यायमूर्ती सहकुटुंब संध्याकाळी शिलाँगला रवाना झाले. कोलकाता ते शिलांग 1100 किमी अंतर आहे. चालक दमल्यावर न्यायमूर्ती समद्दार यांनीही कार चालवली.

(Bombay High Court Dipankar Datta travels by car from Kolkata)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.