LIVE | अभिनेत्री कंगना रनौतला वांद्रे पोलिसांची नोटीस

राज्यातील आणि देशातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी आणि प्रत्येक अपडेटेड बातम्या फक्त एका क्लिकवर

LIVE | अभिनेत्री कंगना रनौतला वांद्रे पोलिसांची नोटीस
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 12:41 PM

[svt-event title=”कंगनाला वांद्रे पोलिसांची नोटीस” date=”03/11/2020,12:40PM” class=”svt-cd-green” ] कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरोधात वांद्रे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे, याबाबत चौकशीसाठी वांद्रे पोलिसांनी हे समन्स बजावलं आहे. कंगनाला 10 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर रहायचं आहे, तर रंगोलीला 11 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर रहायचं आहे [/svt-event]

[svt-event title=”नाशकात मोबाईलवर अश्लील फोटो आणि मेसेज पाठवून तरुणीचा विनयभंग, गुन्हा दाखल” date=”03/11/2020,9:59AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : सोशल मीडियावरुन तरुणीचा विनयभंग, मोबाईलवर अश्लील फोटो आणि मेसेज पाठवून तरुणीचा विनयभंग, रस्त्यात अडवून देखील दमदाटी करण्याचा प्रयत्न, सायबर क्राईम कायद्याअंतर्गत संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल [/svt-event]

[svt-event title=”दख्खनचा राजा जोतिबा मालिकेच्या चित्रीकरणावर बंदी आणा, अन्यथा उद्रेक होईल, वाडीरत्नागिरी ग्रामस्थांचा इशारा ” date=”03/11/2020,9:55AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : दख्खनचा राजा जोतिबा मालिकेच्या चित्रीकरणावर बंदी आणा, अन्यथा उद्रेक होईल, वाडीरत्नागिरी (जोतिबा) ग्रामस्थांचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे इशारा, चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याची ग्रामस्थांची तक्रार, कोठारे प्रॉडक्शनचे महेश कोठारे यांनी दिशाभूल केल्याचाही ग्रामस्थांचा आरोप, मालिकेसाठी ग्रामपंचायतीकडून परवानगी घेतली नसल्याचा ही दावा, केदार विजय ग्रंथा नुसारच कथानक चित्रीकरणाला परवानगी देण्याची मागणी [/svt-event]

[svt-event title=”नाशकात गंगापूर रोडवरील शहीद चौकात महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबवली” date=”03/11/2020,9:52AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना सुरुच, गंगापूर रोडवरील शहीद चौकात महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबवली, दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी हिसकावली महिलेच्या गळ्यातील 5 टोळ्यांची पोत, गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादेत पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या” date=”03/11/2020,9:49AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या, औरंगाबाद जिल्ह्यातील माळीवाडा गावातील घटना, पत्नीचा मृतदेह घरात तर पतीचा मृतदेह आढळला होता तलावात, किरण साठे आणि अशोक साठे असं पती पत्नीचं नाव, 17 महिन्यांपूर्वी केला होता किरण आणि अशोक यांनी प्रेमविवाह, दोघांचेही मृतदेह आढळल्यामुळे सर्वत्र खळबळ, पतीने खून करून आत्महत्या केल्याची पोलिसांना संशय [/svt-event]

[svt-event title=”नो मास्क, नो एन्ट्री अंतर्गत कारवाईला वेग, ऑक्टोबर महिन्यात मास्क न घालणाऱ्या 1,490 जणांवर कारवाई” date=”03/11/2020,9:45AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : नो मास्क, नो एन्ट्री अंतर्गत कारवाईला वेग, ऑक्टोबर महिन्यात मास्क न घालणाऱ्या 1,490 जणांवर कारवाई, तर तब्बल 2 लाख 98 हजारांचा दंड वसूल, कारवाईसाठी शहरातील 6 विभागात पथक तयार , 91 नागरिकांवर न्यायालयाकडून दंडात्मक कारवाई [/svt-event]

[svt-event title=”शहरातील 150 कोटींची कामंअद्याप अपूर्ण, तरी देखील नव्या रस्त्यांचा घाट” date=”03/11/2020,9:42AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : शहरातील 150 कोटींची कामं अद्याप अपूर्ण, तरी देखील नव्या रस्त्यांचा घाट , महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या कामाबाबत संशय, येणाऱ्या महासभेत आवाज उठवण्याची विरोधी पक्षाची तयारी [/svt-event]

[svt-event title=”दोन वर्षांपासून नाशिक जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर कोणतीही अद्ययावत माहिती नाही” date=”03/11/2020,9:41AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : नाशिक जिल्हा परिषद पुन्हा ऑफलाईन, दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर कोणतीही अद्ययावत माहिती नाही, जिल्हा परिषदचे फेसबुक पेज सुरु, संकेतस्थळ मात्र बंद [/svt-event]

[svt-event title=”राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज नाशिकमध्ये, आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन करणार” date=”03/11/2020,9:34AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज नाशिकमध्ये, आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन करणार, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उच्च शिक्षण मंत्री अमित देशमुख राहणार उपस्थित, सकाळी 11 वाजता होणार कार्यक्रमाला सुरुवात [/svt-event]

[svt-event title=”मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना 15,500 बोनस जाहीर झाल्यावर बेस्ट कर्मचारी संघटना आक्रमक” date=”03/11/2020,8:32AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : महापालिका कर्मचाऱ्यांना 15,500 बोनस जाहीर झाल्यावर बेस्ट कर्मचारी संघटना आक्रमक, बेस्ट कर्मचाऱ्यांना सुद्धा पालिकेच्या धर्तीवर बोनस द्यावं अशी बेस्ट संघटनाची मागणी, कोव्हिड काळात बेस्ट कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून काम केलं आहे, योग्य सन्मान केला पाहिजे, गेल्या वर्षी 5,500 रुपये बोनस बेस्ट कर्मचाऱ्यांना देण्यात आला होता, यंदा मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिला तितका बोनस देण्यात यावा अशी मागणी संघटना करत आहेत [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरात स्वामित्व योजनेअंतर्गत जिल्ह्यातील गावात ड्रोन मोजणीला सुरुवात” date=”03/11/2020,8:30AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : स्वामित्व योजनेअंतर्गत जिल्ह्यातील गावात ड्रोन मोजणीला सुरुवात, कागल तालुक्यातील बामणी इथून झाला ड्रोन मोजणीचा शुभारंभ, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते झाला शुभारंभ, ड्रोन मोजणीनंतर गावातील मालमत्तांचे जीआयएस प्रणालीवर आधारित अचूक मालमत्ता पत्रक तयार होणार [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी आमदार निवासाची डागडुजी सुरु, आठ कोटींच्या खर्चाची सुत्रांची माहिती” date=”03/11/2020,8:23AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : अधिवेशनासाठी आमदार निवासात डागडुजी सुरु, दरवर्षीच का करावी लागते आमदार निवासाला पेंटिंग?, गेल्यावर्षी आमदार निवासावर पावणेदोन कोटींचा खर्च, यंदा साधारण आठ कोटींच्या खर्चाची सुत्रांची माहिती, कोरोना काळातील आर्थिक संकटातंही ही उधळपट्टी?, अधिवेशनात मोजकेच आमदार राहतात MLA होस्टेलमध्ये, जुनीच मंजुर कामं सुरु असल्याची PWD ची माहिती, सरकारने इतर अनेक मंजुर कामांचा निधी परत बोलावला, मग इथे वेगळा मियम? [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरी जिल्ह्यातील जलयुक्त शिवारच्या कामांची राज्य सरकाकडून होणार चौकशी” date=”03/11/2020,8:06AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी : जलयुक्त शिवारच्या जिल्ह्यातील कामांची राज्य सरकाकडून होणार चौकशी, जिल्ह्यातील 148 गावातील 3 हजाराहून अधिक कामांची होणार चौकशी, जिल्ह्यात जलयुक्त शिवार कामातून 50 कोटीहून अधिक खर्च, 2014 पासून जिल्ह्यात राबवली गेली होती जलयुक्त शिवार योजना, दापोली, मंडणड आणि खेड तालुक्यातील जलयुक्त शिवार कामांचा ‘टीव्ही 9’ने केला होता भांडाफोड [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका सहा महिन्यानंतर कोरोनामुक्त” date=”03/11/2020,8:03AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका कोरोनामुक्त, सहा महिन्यानंतर राजापूर तालुका कोरोनामुक्त, महसुल, आरोग्य, पंचायत समिती, पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांचे योगदान, आज तालुक्यात एकही अॅक्टिव्ह रुग्ण नाही, तालुक्यात कोरोनाचे एकूण 338 रुग्ण [/svt-event]

[svt-event title=”नागपूर जिल्ह्यातील 17677 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात मिळणार कोरोना लस” date=”03/11/2020,8:02AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : जिल्ह्यातील 17677 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात मिळणार कोरोना लस, कोरोना लसीच्या पहिल्या टप्प्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी, जिल्ह्यात 5989 खाजगी आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश, कोरोना लसीसाठी पहिला नंबर हायरिस्क गटाचा, नागपुरात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीची चाचणी सुरु [/svt-event]

[svt-event title=”नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेची रेती माफियांवर धाड, भंडारा मार्गावर पोलिसांनी चार ट्रक पकडले” date=”03/11/2020,7:27AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेची रेती माफियांवर धाड, भंडारा मार्गावर पोलिसांनी चार ट्रक पकडले, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानं कारवाई, नागपूरसह परिसरात सर्रास रेतीची अवैध वाहतूक, रेती माफियांना आरटीओ, महसूल विभागाच्या मदतीचाही आरोप, जप्त केलेली रेती गोंदिया वरुन नागपुरात आणण्यात येत होती [/svt-event]

[svt-event title=”नागपूर जिल्ह्यात रुग्ण दुपटीचा दर चार दिवसांत 170 वरुन 216 दिवसांवर” date=”03/11/2020,7:25AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण दुपटीचा दर 216 दिवसांवर, चार दिवसांत रुग्ण दुपटीचा दर 170 वरुन 216 दिवसांवर, रुग्ण दुपटीचा दर वाढल्याने मोठा दिलासा, 24 तासांत जिल्ह्यात 10 मृत्यू आणि 279 नव्या रुग्णांची नोंद, जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 1,03,257 वर, आतापर्यंत 96,108 रुग्ण कोरोनामुक्त [/svt-event]

[svt-event title=”अस्थायी डॉक्टरांना स्थायी करण्याची मागणी, नागपुरातील मेडिकल आणि मेयोतील डॉक्टर संपावर” date=”03/11/2020,7:20AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपुरातील मेडिकल आणि मेयोतील डॉक्टर संपावर, अस्थायी डॉक्टरांना स्थायी करण्याची मागणी, डॉक्टरांच्या संपामुळे आरोग्यसेवा प्रभावित, मेयोमधली 15 आणि मेडिकलमधील 33 डॉक्टर संपात सहभागी, अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांना नियमित करण्याची मागणी, कोरोनाच्या संकटात डॉक्टरांच्या संपाचा रुग्णसेवेवर परिणाम [/svt-event]

[svt-event title=”न्हावा-शेवा बंदरातून 14 कोटींची विदेशी सिगारेट जप्त” date=”03/11/2020,7:15AM” class=”svt-cd-green” ] रायगड : न्हावा-शेवा बंदरातून 14 कोटींची विदेशी सिगारेट जप्त, मुंबई सीमा शुल्क विभागाने शनिवारी केली कारवाई, सहा महिन्यातील तिसरी घटना, मात्र अद्याप कोणालाही अटक नाही [/svt-event]

[svt-event date=”03/11/2020,7:10AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.