सर्दी, खोकल्याच्या त्रासामुळे विलगीकरण कक्षात उपचार, बुलडाण्यात कोरोना संशयित महिलेचा मृत्यू

बुलडाण्यातील खामगावमध्ये एका 65 वर्षीय कोरोना संशयित महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेवर विलगीकरण कक्षात उपचार सुरु (Buldana Corona Suspect death) होते.

सर्दी, खोकल्याच्या त्रासामुळे विलगीकरण कक्षात उपचार, बुलडाण्यात कोरोना संशयित महिलेचा मृत्यू

बुलडाणा : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत (Buldana Corona Suspect death) असता मृतांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. नुकतचं बुलडाण्यातील खामगावमध्ये एका 65 वर्षीय कोरोना संशयित महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेवर विलगीकरण कक्षात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

बुलडाणा जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 17 वर पोहोचला (Buldana Corona Suspect death) आहे. सातत्याने वाढते रुग्ण हे जिल्ह्यातील नागरिकांच्या चिंतेत भर घालणारे आहेत. खामगाव तालुक्यातील चितोड गावात दोन कोरोना संशयित रुग्ण आढळून आले होते. यातील एका कोरोना संशयित वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.

या महिलेला गेल्या काही दिवसांपासून सर्दी, खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे तिला कोरोना कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज (11 मार्च) या 65 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही महिला कोरोना संशयित असून ग्रामीण भागातील असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं होतं.

मात्र अद्याप या महिलेच्या कोरोना चाचणीचा अहवाल आलेला नाही. त्यामुळे तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती अहवाल आल्यानंतरच प्राप्त होईल, अशी माहिती बुलडाण्यातील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिली.

राज्यात काल दिवसभरात कोरोनाच्या 210 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या 1574 वर पोहचली आहे. यात मुंबईत सर्वाधिक 1008 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ पुण्यात 226 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच राज्यात कोरोनाबळींची संख्या 110 वर पोहोचली आहे. यात सर्वाधिक 64 मृत्यू हे मुंबईतील (Buldana Corona Suspect death) आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI