बुलडाण्यात वयोवृद्ध दाम्पत्याचा जळून मृत्यू, घातपात की आत्महत्या?

बुलडाण्यात वयोवृद्ध दाम्पत्याचा जळून मृत्यू, घातपात की आत्महत्या?

शिवारातील शेतातील गंजिला आग लागून वयोवृद्ध दाम्पत्याचा जळून मृत्यू झाला आहे. खामगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील जयपूर लांडे शिवारात ही घटना घडली.

Nupur Chilkulwar

|

Jun 13, 2020 | 5:42 PM

बुलडाणा : शिवारातील शेतातील गंजिला आग (Buldhana Old Couple Died) लागून वयोवृद्ध दाम्पत्याचा जळून मृत्यू झाला आहे. खामगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील जयपूर लांडे शिवारात ही घटना घडली. यामध्ये श्रीकृष्ण लांडे (वय 75) आणि सईबाई लांडे (वय 70) यांचा मृत्यू झाला आहे. या वयोवृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केल्याची चर्चा गावात होत (Buldhana Old Couple Died) आहे.

खामगांव तालुक्यातील जयपुर लांडे येथील श्रीकृष्ण लांडे आणि पत्नी सईबाई लांडे हे रोजच्या प्रमाणे सकाळी शेतामधे काम करण्यासाठी गेले होते. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांचा पुतण्या आणि मुलगा भानुदास लांडे हो त्यांना शोधायला शेताकडे गेले. तेव्हा त्यांना शेतातील कापससाच्या पराटीच्या गंजिमध्ये हे दोघेही जळालेल्या अवस्थेत दिसले.

त्यांनी तात्काळ शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिली (Buldhana Old Couple Died). घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. मृतक दोघेही 20 वर्षांपासून आपल्या मुलांपासून वेगळे राहत असल्याची माहिती आहे.

गंजिला आग लागून मृत्यू झाल्याचा अंदाज प्राथमिक तपासात वर्तवण्यात आला असला, तरी त्यांनी आत्महत्या केली, की त्यांची हत्या करण्यात आली, हे अद्यापही अस्पष्ट आहे. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी दिली. पुढील तपास ठाणेदार अंबुलकर करत (Buldhana Old Couple Died) आहेत.

संबंधित बातम्या :

तुझं वागणं बरोबर नाही, चारित्र्यावरुन संशय, पती, सासू, दिराकडून विवाहितेचं मुंडन

Jalgaon Murder | दारु पिताना वाद, बिअरच्या फुटलेल्या बाटलीने मानेवर वार, हॉटेल मालकाची हत्या

लग्नाच्या पहिल्याच रात्री हत्येचा थरार, पत्नीचा जीव घेऊन 24 वर्षीय तरुणाचा गळफास

औरंगाबादेतील सख्ख्या बहीण-भावाच्या हत्येचा उलगडा, चुलत भावाला अटक

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें