AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादः वाहेगावात आढळलेल्या जळीत डस्टरचा उलगडा, कर्ज बुडवण्यासाठी मालकानेच घडवले अग्निकांड

पोलिसांनी गाडी मालकाची रितसर चौकशी केली असता मालकाने आपला गुन्हा कबूल केला. या गाडीच्या दुरुस्तीचे काम निघाले होते. तसेच गाडीवरील कर्ज बुडवण्यासाठी आपण ही गाडी जाळल्याची कबुली गावंडे याने पोलिसांना दिली.

औरंगाबादः वाहेगावात आढळलेल्या जळीत डस्टरचा उलगडा, कर्ज बुडवण्यासाठी मालकानेच घडवले अग्निकांड
वाहेगावमध्ये 22 ऑक्टोबर रोजी जळीत कार आढळली होती.
| Edited By: | Updated on: Oct 29, 2021 | 2:37 PM
Share

औरंगाबादः पैठण तालुक्यातील वाहेगाव (Wahegaon, Paithan) येथे काही दिवसांपूर्वी डस्टर कार (burned car) जळून खाक झाल्याचे समोर आले होते. ही गाडी नेमकी कुणी जाळली, याविषयी अनेक चर्चा होऊ लागल्या. मात्र आता या चर्चांवर पडदा पडला आहे. ही कार खुद्द मालकानेच जाळल्याचे समोर आले आहे. गाडीमालकाने कर्ज बुडवण्याच्या हेतूने हा खटाटोप केल्याचे पैठण एमआयडीसी पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

22 ऑक्टोबर रोजी आढळली जळीत बेवारस

पैठण तालुक्यातील वाहेगाव येथे 22 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री जळालेली ही डस्टर गाडी बेवारस स्थितीत आढळून आली होती. गाडीच्या नंबर प्लेटवरून ही गाडी गंगापूर तालुक्यातील मानेगाव येथील असल्याचे समोर आले. गाडी मालकाने गाडी चोरीला गेल्याची फिर्यादही गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेली होती. त्यामुळे चोरट्याने ही गाडी वाहेगाव भागात आणून जाळल्याचे प्रथमदर्शनी वाटत होते.

पोलिसांना संशय आल्याने मालकाचे पितळ उघडे

प्रथम दर्शनी चोरट्यानेही ही गाडी येथे आणून जाळल्याचे दिसत असले तरीही या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांना काहीतरी संशय आला. घडला प्रकार, दिसतोय तेवढा साधा नसल्याचे वाटत होते. त्यामुळे त्यांनी सखोल तपास करून घटनाक्रमाची साखली जोडली. तेव्हा चोराने नव्हे तर गाडीमालक महेश गावंडे यानेच गाडीचे अग्निकांड घडवून आणल्याचे समोर आले.

कर्ज बुडवण्यासाठी घडवले अग्निकांड

दरम्यान, पोलिसांनी गाडी मालकाची रितसर चौकशी केली असता मालकाने आपला गुन्हा कबूल केला. या गाडीच्या दुरुस्तीचे काम निघाले होते. तसेच गाडीवरील कर्ज बुडवण्यासाठी आपण ही गाडी जाळल्याची कबुली गावंडे याने पोलिसांना दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून गावंडेला गंगापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलीस अधीक्षक निमित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, फौजदार राहुल भदरगे, दिलीप चौरे, बीट जमादार कातडे, खंडागळे यांनी ही कामगिरी केली.

इतर बातम्या-

अतिक्रमणाच्या विळख्यातून पैठण गेटची मुक्तता, औरंगाबाद महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाची कारवाई

‘आपला शेजारी खरा पहारेदार’, सुरक्षित दिवाळीसाठी औरंगाबाद शहर पोलिसांचे अभियान, नागरिकांसाठी काय आहेत सूचना? 

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.