बारामती फाट्यावर एसटीसोबत तिहेरी अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

बारामती फाट्यावर एसटीसोबत तिहेरी अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

पुणे : एसटी बस आणि दोन दुचाकींच्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पुणे जिल्ह्यातील खडकीत घडली आहे. पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील खडकी येथील मुख्य चौक बारामती फाट्यावर एसटी बस आणि दोन मोटरसायकल यांच्यातील तिहेरी अपघात झाला. यात दोन जण जखमीही झाले आहेत.

या अपघातात पोपट पतंगे आणि ज्ञानदेव नामदेव झगडे अशी जागीच मृत पावलेल्याची नावे आहेत. तर दोघे जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर भिगवण येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.

राज्य परिवहन महामंडळाची पुणे-नांदेड बस भिगवन बाजूकडे जात असताना खडकी गावचा बाजार असल्याने महामार्गावरील मुख्य चौकात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची ये जा होती. रस्ता क्रॉसिंगवर दोन्ही मोटारसायकल स्वार अचानक वळले आणि हा अपघात झाला.

Published On - 10:25 pm, Fri, 10 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI