बस आणि इनोव्हा कारची भीषण धडक, चौघेजण जागीच ठार, 3 गंभीर जखमी

बस आणि भरधाव इनोव्हा कार एकमेकांसमोर धडकली. यामध्ये कार पुढच्या बाजूने पूर्णपणे बसच्या इंजिनमध्ये शिरल्याचं सांगण्यात येत आहे.

बस आणि इनोव्हा कारची भीषण धडक, चौघेजण जागीच ठार, 3 गंभीर जखमी


कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. बस आणि इनोव्हा कारची समोरासमोर धडक झाली आहे. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. भर रस्त्यात हा अपघात झाल्यामुळे कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे. (bus and Inova car accident at kolhapur Four killed three seriously injured )

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर गगनबावडा मार्गावर कळंबे तर्फ कळे इथं हा भीषण अपघात झाला आहे. बस आणि भरधाव इनोव्हा कार एकमेकांसमोर धडकली. यामध्ये कार पुढच्या बाजूने पूर्णपणे बसच्या इंजिनमध्ये शिरल्याचं सांगण्यात येत आहे. तर फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे कारचा चुरा झाला आहे.

उत्तर महाराष्ट्रात भाजपचा एकही आमदार, खासदार दिसणार नाही – अनिल पाटील

हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

अपघात घडताच स्थानिकांनी तात्काळ पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी 3 जखमींना उपचारासाठी नजिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं सांगण्यात येत आहे. तर कारमधून चौघांचे मृतदेह बाहेर काढले असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

पीकअपच्या भीषण अपघातात दुचाकीस्वारांनी दिला मृत्यूला चकवा, थरकाप उडवणारं CCTV फूटेज

दरम्यान, भर रस्त्यामध्ये अपघात झाल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत तर स्थानिकांनीही परिसरात मोठी गर्दी केली आहे. तर अपघाती वाहनं बाजूला करून आता इतर वाहनांना जागा देण्याते येत आहे.

(bus and Inova car accident at kolhapur Four killed three seriously injured )

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI