AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE: पंतप्रधान मोदींचा 69 वा वाढदिवस, देशभरातून शुभेच्छांचा पाऊस

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज (17 सप्टेंबर) 69 वा वाढदिवस (Narendra Modi Birthday) आहे. त्यानिमित्ताने देशभरात कार्यकर्त्यांकडून जल्लोष व्यक्त केला जात आहे.

LIVE: पंतप्रधान मोदींचा 69 वा वाढदिवस, देशभरातून शुभेच्छांचा पाऊस
| Updated on: Sep 17, 2019 | 1:38 PM
Share

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज (17 सप्टेंबर) 69 वा वाढदिवस (Narendra Modi Birthday) आहे. त्यानिमित्ताने देशभरात कार्यकर्त्यांकडून शुभच्छांचा पाऊस पडत आहे.  कार्यकर्ते जल्लोष व्यक्त करत अनेक कार्यक्रमाचंही आयोजन करत आहेत. वाढदिवसाच्या दिवशी मोदी वेगवगळ्या ठिकाणी भेट देणार आहेत. सकाळी 8 वाजता ते नर्मदेची पूजा करणार आहेत.

LIVE Updates

[svt-event title=”विकासासोबत पर्यावरणाचं रक्षण करता येतं : नरेंद्र मोदी” date=”17/09/2019,1:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नर्मदा जिल्ह्यातील गरुडेश्वर दत्त मंदिरात पूजा करताना पंतप्रधान मोदी” date=”17/09/2019,12:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधान मोदी सरदार सरोवर धरणावर पूजा करताना” date=”17/09/2019,11:07AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”स्टॅच्यू ऑफ युनिटीमधील एकता नर्सरीला मोदींची भेट” date=”17/09/2019,11:03AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधान मोदी केवाडिया येथील फुलपाखरु उद्यानात” date=”17/09/2019,11:01AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मोदींकडून केवाडिया येथील कॅक्टस उद्यानालाही भेट” date=”17/09/2019,9:45AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”केवाडिया येथील जंगल सफारी पार्कला भेट देताना पंतप्रधान मोदी” date=”17/09/2019,9:42AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधान मोदींची केवडिया येथील खालवानी पर्यटन स्थळाला भेट” date=”17/09/2019,8:49AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधान मोदी नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथे दाखल, थोड्याच वेळात सरदार सरोवर धरणाला भेट देणार” date=”17/09/2019,8:34AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

पंतप्रधान मोदी आई हिराबेन यांचीही भेट घेणार आहेत. मात्र, त्याआधी ते नर्मदा नदीवरील केवडिया धरणावर जातील. सकाळी 10 वाजता मोदी गरुडेश्वर मंदिरालाही भेट देतील.

देशभरातून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. ट्विटरवर पहिल्या 10 ट्रेंडपैकी 7 ट्रेंड केवळ मोदींच्या वाढदिवसाशी संबंधित आहेत. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरातील त्यांचे समर्थक वेगवेगळे हॅशटॅग वापरून शुभेच्छा देत आहेत.

सोमवारी रात्री मोदींचे अहमदाबादमध्ये देखील विशेष स्वागत झाले. पंतप्रधान मोदी रात्री उशिरा अमहदाबाद विमानतळावर दाखल झाल्यानंतर उपस्थितांनी घोषणा देत मोदींच्या वाढदिवसाचा आनंद साजरा केला. समर्थकांच्या शुभेच्छांचा स्विकार करत मोदींनीही त्यांना प्रतिसाद दिला.

दिल्ली भाजपच्या कार्यकर्त्यांनीही पंतप्रधान मोदींचा वाढदिवस मध्यरात्रीच्यावेळी इंडिया गेट येथे साजरा केला. भोपाळमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी 69 फूट उंचीचा केक कापून मोदींचा वाढदिवस साजरा केला.

मोदींच्या भेटींची दिवसभरातील रुपरेषा

पंतप्रधान मोदी आज सरदार सरोवर धरणालाही भेट देणार आहेत. धरणातील पाण्याची पातळी 138.68 मीटर झाली आहे. 2 वर्षांआधी पूर्ण झालेले हे धरण पहिल्यांदा पूर्ण क्षमतेने भरण्यात आले आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त गुजरातमध्ये नर्मदा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जवळजवळ 5000 ठिकाणांवर नर्मदेची आरती करण्यात येणार आहे. मोदी 10 वाजता गरूडेश्वरदत्त मंदिरात पूजा करतील. त्यानंतर ते एका सभेला संबोधित करतील.

गुजरात सरकारने मोदींच्या वाढदिवसानिमित्त केवाडिया येथे ‘नमामि देवी नर्मदा महोत्सवाचे’ आयोजन केले आहे. केवाडिया धरणावर महाआरती देखील घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी स्वतः ट्विट करत याची माहिती दिली आहे. सायंकाळी सूरतमधील भाजप आमदार हर्ष सांघवी यांनी एका प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. यात ‘सिंगल यूज प्लास्टिक थीम’वर आधारीत प्रदर्शन पाहायला मिळेल. तसेच मोदींच्या जीवनावर आधारित गोष्टीचंही प्रदर्शन होईल.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.