गली बॉयमधील आलिया भट्ट-रणवीर सिंहच्या किसिंग सीनवर कात्री?

गली बॉयमधील आलिया भट्ट-रणवीर सिंहच्या किसिंग सीनवर कात्री?

मुंबई : अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्टचा नवीन चित्रपट गली बॉय येत्या 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. चाहते मोठ्या उत्साहाने चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. मात्र प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी आहे. गली बॉय चित्रपटातील काही सीनवर सेन्सॉर बोर्डाने कात्री मारली आहे. सेन्सॉर बोर्डाने आलिया आणि रणवीर सिंहच्या 13 सेकंदाच्या किसिंग सीनवर पहिली कात्री मारली आहे.

आलिया आणि रणवीर सिंहचा 13 सेकंदाचा किसिंग सीन सेन्सॉर बोर्डाने हटवला आहे. चित्रपटात बऱ्याच ठिकाणी आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले आहेत, ते सुद्धा हटवण्यात आले आहेत. मात्र ट्रेलरमध्ये आलिया आणि रणवीर सिंहचा किसिंग सीन दाखवला आहे. कोणत्याही चित्रपटातील सीनवर कात्री मारण्याची ही पहिली घटना नाही. सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीसमोर अनेक बॉलिवूड चित्रपटांना सामना करावा लागला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या या प्रकारामुळे अनेकवेळा दिग्दर्शकांनी आवाजही उठवला आहे.

गली बॉयच्या सीनवर सेन्सॉरने कात्री मारल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. नुकतेच हा चित्रपट बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवण्यात आला होता. जिथे चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. विशेष म्हणजे चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तसेच त्यांना लोखोंचे व्ह्यूज मिळत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI