Corona | पुण्यात संचारबंदीचा प्रस्ताव, तुळशीबाग तीन दिवस बंद

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पुण्यात आठ ठिकाणी संचारबंदी करण्यात यावी असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

Corona | पुण्यात संचारबंदीचा प्रस्ताव, तुळशीबाग तीन दिवस बंद

पुणे : कोरोनाचा (Corona Virus) वाढता संसर्ग रोखण्यासाठी (Cerfew Praposal In Pune) पुण्यात आठ ठिकाणी संचारबंदी करण्यात यावी असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा धोका पाहता संचारबंदीचा लागू करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठवण्यात आला. या (Cerfew Praposal In Pune) ठिकाणांमध्ये पुणे महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसराचाही समावेश आहे.

पालिका आयुक्तांनी जिल्हाधिकारी आणि पुणे पोलीस आयुक्तांना रविवारी संध्याकाळी याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावावर पोलीस आयुक्त आज निर्णय घेणार आहेत.

हेही वाचा : Corona | पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली, राज्यातील रुग्णांची संख्या 33 वर

तुळशीबाग आजपासून तीन दिवस बंद

दुसरीकडे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग आजपासून तीन दिवस बंद राहणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व्यापारी असोसिएशने हा निर्णय घेतला आहे.

पुण्यातील तुळशीबाग हे विविध प्रकारच्या वस्तूंच्या (Cerfew Praposal In Pune) खरेदीसाठी महिलांचे आवडीचे ठिकाण आहे. तुळशीबागेतील ग्राहकांची गर्दी लक्षात घेऊन, हा निर्णय घेण्यात आला आहे. विश्रामबाग पोलिसांनी व्यापारी असोसिएशनला केलेल्या आवाहनाला असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद देत हा निर्णय घेतला आहे.

पुण्यात आजपासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण

तसेच, पुण्यात आजपासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी पालिकेने 125 पथकं तयार केली असून एका पथकामध्ये 3 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. परदेशातून पुण्यात आलेल्या नागरिकांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये कोरोनाची माहिती आणि वैद्यकीय सल्ला देण्याचं कामही पथक करणार आहे.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 33 वर

दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुण्यात आणखी एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 33 वर पोहोचली आहे. तर पुण्यात कोरोना रुग्णांची (Cerfew Praposal In Pune) संख्या 15 वरुन 16 झाली आहे.

संबंधित बातम्या :

Corona | देशभरात टीव्ही मालिका-चित्रपटांचं शूटिंग 31 मार्चपर्यंत बंद

कोरोनामुळे साखरपुड्यातच लग्न उरकलं, वाचलेले पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

इटली-स्पेनमध्ये लॉकडाऊन, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर कोणत्या देशात काय खबरदारी?

11 रुपयांचे लॉकेट विकून फसवणूक, उत्तर प्रदेश पोलिसांकडून कोरोना बाबाला अटक

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI