अक्षय कुमारच्या हेलिकॉप्टर दौरा वादावर मंत्री छगन भुजबळांकडून पडदा

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या नाशिक दौऱ्यावरुन तयार झालेल्या वादावर पडदा पडला आहे (Chhagan Bhujbal on Akshay Kumar helicopter controversy).

अक्षय कुमारच्या हेलिकॉप्टर दौरा वादावर मंत्री छगन भुजबळांकडून पडदा
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jul 06, 2020 | 11:38 AM

नाशिक : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या नाशिक दौऱ्यावरुन तयार झालेल्या वादावर पडदा पडला आहे (Chhagan Bhujbal on Akshay Kumar helicopter controversy). स्वतः नाशिकचे पालकमंत्री आणि अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीच यावर खुलासा केला. मी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितले होते. चौकशीत अक्षय कुमारला मुंबई पोलिसांनी परवानगी दिली होती. त्यामुळेच त्यांचं हेलिकॉप्टर नाशिकमध्ये आल्याचा खुलासा छगन भूजबळ यांनी केला.

छगन भुजबळ म्हणाले, “मी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितले होते. चौकशीत अक्षय कुमारला मुंबई पोलिसांनी परवानगी दिली होती. त्यामुळेच त्यांचं हेलिकॉप्टर नाशिकमध्ये आलं. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात खुलासा केला आहे.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

दरम्यान याआधी अभिनेता अक्षय कुमारचा नाशिकचा खासगी दौरा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी मिळाली? तसेच, ग्रामीण भागात त्याला शहरी पोलिसांचं संरक्षण का? याप्रकरणी छगन भुजबळ यांनी चौकशीचे आदेश दिले होते.

“मुख्यमंत्र्यांपासून सगळे मंत्री गाडीतून फिरत असताना,अभितेना अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी मिळाली?”, असा सवाल पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला होता. तसेच याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.

“नियम डावलून अक्षय कुमारला व्हीआयपी ट्रीटमेंटचा प्रकार धक्कादायक आहे. ग्रामीण भाग असताना अक्षय कुमारला शहर पोलिसांचा एस्कॉर्ट कसा?” असा प्रश्न भुजबळांनी उपस्थित करत जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितले होते.

‘हॉटेल हाही उद्योग, त्यामुळे लवकरच हॉटेल सुरु करणं आवश्यक’

छगन भूजबळ यांनी यावेळी राज्यातील हॉटेल व्यवसायिकांच्या प्रश्नावरही भाष्य केलं. तसेच राज्यातील हॉटेल नियम व अटींसह सुरु करण्याचे संकेत भूजबळ यांनी दिले. ते म्हणाले, “राज्यातील हॉटेल सुरु करण्याविषयी विचार सुरु आहे. हॉटेलसाठी नियम बनवता येतील का यावरही काम सुरु आहे. हॉटेल हा उद्योग आहे. त्यामुळे ते सुरु करणं आवश्यक आहे.”

“आम्ही गहू तांदूळ दिले म्हणून भागणार नाही. इतर गोष्टी लागतातच”, असं म्हणत भूजबळ यांनी आणकी बरंच काम करणं बाकी असल्याचं मान्य केलं.

हेही वाचा :

मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्री गाडीने, मग अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी?, भुजबळांचे चौकशीचे आदेश

गर्भवती आणि दुर्धर आजार असलेल्या महिलांना ‘वर्क फ्रॉर्म होम’ची मुभा द्या, यशोमती ठाकूर यांची मागणी

Chhagan Bhujbal on Akshay Kumar helicopter controversy

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें