मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्री गाडीने, मग अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी?, भुजबळांचे चौकशीचे आदेश

अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी मिळाली? तसेच, ग्रामीण भागात त्याला शहरी पोलिसांचं संरक्षण का?, याप्रकरणी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्री गाडीने, मग अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी?, भुजबळांचे चौकशीचे आदेश

नाशिक : अभिनेता अक्षय कुमारचा नाशिकचा खासगी दौरा आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी मिळाली? तसेच, ग्रामीण भागात त्याला शहरी पोलिसांचं संरक्षण का?, याप्रकरणी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत (Chhagan Bhujbal Gave Inquiry Orders Of Akshay Kumar Nashik Visit).

“मुख्यमंत्र्यांपासून सगळे मंत्री गाडीतून फिरत असताना,अभितेना अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी मिळाली?, असा सवाल पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे”. याप्रकरणी भुजबळांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

“नियम डावलून अक्षय कुमारला व्हीआयपी ट्रीटमेंटचा प्रकार धक्कादायक आहे. ग्रामीण भाग असताना अक्षय कुमारला शहर पोलिसांचा एस्कॉर्ट कसा?” याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश भुजबळांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

छगन भुजबळांनी आज नाशिकच्या ठक्कर डोममधील कोव्हिड सेंटरची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त उपस्थित होते. ठक्कर डोम मध्ये 350 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. निमा संस्थेतर्फे ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात येणार आहे. ज्या व्यवस्था कमी पडतील त्या शासनाच्या वतीने केल्या जातील, अशी माहिती यावेळी भुजबळांनी दिली (Chhagan Bhujbal Gave Inquiry Orders Of Akshay Kumar Nashik Visit).

“अधिकची सोय करुन ठेवण्याची गरज आहे. शहरातील रुग्णालयात पुरेशा जागा शिल्लक आहेत. मात्र, आपत्कालीन व्यवस्था म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे. खाजगी हॉस्पिटलचे अधिकार जिल्हाधिकारी आणि आयुक्तांकडे असतील”, असं भुजबळांनी सांगितलं.

तसेच, कर्फ्यूला जनतेचा मिळालेला प्रतिसाद बघून लॉकडाऊनचा निर्णय घेऊ, असंही ते म्हणाले.

Chhagan Bhujbal Gave Inquiry Orders Of Akshay Kumar Nashik Visit

संबंधित बातम्या :

नाशकात खाजगी रुग्णालयांचे नियंत्रण जिल्हाधिकारी आणि आयुक्तांकडे, भुजबळांचे आदेश

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *