AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जीवनावश्यक वस्तूंची दुकान 24 तास सुरु, लोक फिरायला निघत असतील, तर ही सोय बंद करु : मुख्यमंत्री

मुंबईत साथ फैलावून आणखी दुषित क्षेत्र निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे," असेही उद्धव ठाकरे (Cm Uddhav thakceray Mumbai Corona) म्हणाले.

जीवनावश्यक वस्तूंची दुकान 24 तास सुरु, लोक फिरायला निघत असतील, तर ही सोय बंद करु : मुख्यमंत्री
| Updated on: Mar 31, 2020 | 4:45 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 237 वर पोहोचला (Cm Uddhav Thackeray Mumbai Corona) आहे. यात मुंबईत सर्वाधिक 97 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईत दाट लोकवस्ती, लोकसंख्या यामुळे कोरोनाच प्रसार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त तसेच वॉर्ड अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

“आपण लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, औषधांची दुकाने २४ तास सुरु (Cm Uddhav Thackeray Mumbai Corona) ठेवली. मात्र, याचा गैरफायदा घेऊन लोक फिरायला निघाल्यासारखे निघत आहेत. जर असे झाले तर ही सोय देखील बंद करण्याचा कठोर निर्णय प्रसंगी घ्यावा लागेल,” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

“मुंबई हे देशातील एक प्रमुख शहर आणि आर्थिक राजधानी. याठिकाणी कोरोना विषाणूंच्या फैलावावर कोणत्याही परिस्थितीत नियंत्रण राहिले पाहिजे. त्यासाठी युद्धपातळीवर काटेकोर पाऊले उचला. शहरातील 227 प्रभागांमधील घराघरांमध्ये आजपासून भरारी पथकांमार्फत तपासणी करा,” असे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

“वरळी कोळीवाड्यात कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर संपूर्ण कोळीवाडा परिसर दुषित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. तेथील नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध ठेवण्यात आले आहेत. या घटनेनंतर अशाचप्रकारे मुंबईत साथ फैलावून आणखी दुषित क्षेत्र निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“तसेच 12 ते 23 मार्चपर्यंत परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्ती अधिक बारकाईने तपासा. त्यांना क्वारंटाईन कसे करता येईल ते पहा. अद्यापही काही व्यक्ती सापडू शकलेल्या नसतील त्यांना कोणत्याही परिस्थितीत शोधा. त्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घ्या,” असेही निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

“आपापल्या वॉर्डमधल्या खासगी डॉक्टर्सना शोधून त्यांना त्यांचे दवाखाने सुरु करण्याची विनंती करा. त्यांना आवश्यक ते मास्क वगैरे द्या, पण नियमित रुग्ण तपासण्यास सुरुवात झाली तर शासकीय आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी होईल,” असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

“वस्त्यांमधील स्वच्छतागृहे स्वच्छ राहतील. त्याठिकाणी आवश्यक फवारणी होत राहील. हात धुवायला साबण राहतील, या गोष्टींकडे लक्ष द्या. वस्त्यांमध्ये साथीचा आजार पसरायला वेळ लागणार नाही. त्यामुळे वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता राहिलीच पाहिजे,” असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“आपल्याकडे कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 20 ते 40 वयोगटातील रुग्ण आहे. परंतु, खऱ्या अर्थाने वृद्ध नागरिकांना जीवाचा धोका आहे. त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा. ही साथ ज्येष्ठ नागरिक वयोगटात पसरली तर नियंत्रणासाठी खूप प्रयत्न करावे लागतील,” असेही ते यावेळी (Cm Uddhav Thackeray Mumbai Corona) म्हणाले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...