बारामतीच्या कोरोनाबाधिताची ओळख उघड, व्हॉट्सअॅप ग्रुप ॲडमिनसह तिघांवर गुन्हा

पुण्यातील ससून रुग्णालयात न्यूमोनियाचे उपचार घेत असणाऱ्या बारामतीच्या रुग्णाचा ‘कोरोना’ रिपोर्ट रविवार 29 मार्चला पॉझिटिव्ह आला होता. (Baramati Corona Patient Identity Disclosed)

बारामतीच्या कोरोनाबाधिताची ओळख उघड, व्हॉट्सअॅप ग्रुप ॲडमिनसह तिघांवर गुन्हा

बारामती : ‘कोरोना’बाधित रुग्णाची ओळख उघड करणे तिघांना चांगलेच महागात पडले आहे. बारामतीमधील ‘कोरोना’ रुग्णाचे फोटो आणि माहिती व्हायरल करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Baramati Corona Patient Identity Disclosed)

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 52 आणि 54, तसेच भादंवि कलम 188, 505 (2), 109, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती शहर पोलिसांनी व्हॉट्सअॅप ग्रुप ॲडमिनसह मेसेज पसरवणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, बारामतीतील नागरिकांना दिलासा देणारी बाब म्हणजे ‘त्या’ कोरोनाग्रस्त रुग्णाच्या नातेवाईकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. परंतु खबरदारी म्हणून पुढचे 14 दिवस त्यांना घरीच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी ही माहिती दिली असून तालुक्यातील सर्वच नागरिकांना घरीच थांबण्याचं आवाहन केलं आहे.

पुण्यातील ससून रुग्णालयात न्यूमोनियाचे उपचार घेत असणाऱ्या रुग्णाचा ‘कोरोना’ रिपोर्ट रविवार 29 मार्चला पॉझिटिव्ह आला होता. हा रुग्ण मूळ बारामतीचा आहे. उपचारादरम्यान त्याची ‘कोरोना’ चाचणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं.

कोणीही घराबाहेर न पडता संयमाच्या ‘बारामती पॅटर्न’चा आदर्श राज्यासमोर घालून देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. तर कोणत्याही अफवांना बळी न पडता संयम राखावा, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते.

हे संकट आपल्या दारात आले असताना आपण घाबरुन न जाता या परिस्थितीचा संयमाने मुकाबला करावा. बारामतीत सापडलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी तयार करण्याचे काम सुरु आहे. बारामतीतील काही परिसर सील करण्यात आला आहे, तसेच तातडीने निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे, असं अजित पवारांनी सांगितलं होतं. Baramati Corona Patient Identity Disclosed

या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार अत्यंत खंबीर पावले उचलत आहे. या संकटाचा विस्तार होऊ नये म्हणून आपण ‘लॉकडाऊन’चा पर्याय निवडला आहे. या संकटाला आपल्याला याच टप्प्यावर रोखायचे आहे. त्यासाठी कोणीही अनावश्यक घराबाहेर पडू नये. आपल्या बारामतीच्या पॅटर्नचा देशभारत लौकिक आहे, या लौकिकाला साजेसच या संकटाला आपण तोंड देऊया, असे आवाहन अजित पवारांनी केले होते.

Baramati Corona Patient Identity Disclosed

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *