कोरोनाचा बारामतीत प्रवेश, न्यूमोनियाचे उपचार घेणारा रुग्ण 'कोरोना' पॉझिटिव्ह

पिंपरी चिंचवड धरून पुण्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 37 वर गेला आहे. तर राज्यात कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या 203 वर पोहोचली आहे (Corona Patient found in Baramati)

कोरोनाचा बारामतीत प्रवेश, न्यूमोनियाचे उपचार घेणारा रुग्ण 'कोरोना' पॉझिटिव्ह

पुणे : ‘कोरोना’चा आता बारामतीतही शिरकाव झाल्याचं वृत्त समोर येत आहे. पुण्यात आज एका ‘कोरोना’ रुग्णाची वाढ झाली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात न्यूमोनियाचे उपचार घेत असणाऱ्या रुग्णाचा ‘कोरोना’ रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. (Corona Patient found in Baramati)

ससून रुग्णालयात न्यूमोनियाचे उपचार घेणारा रुग्ण मूळ बारामतीचा आहे. उपचारादरम्यान त्याची ‘कोरोना’ चाचणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. पिंपरी चिंचवड धरून पुण्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 37 वर गेला आहे.

राज्यात कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या 203 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात आज (29 मार्च) नव्याने बावीस रुग्णांची नोंद झाली आहे.
या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक 10 रुग्ण मुंबईचे आहेत, तर 5 पुण्याचे, 3 नागपूरचे, 2 अहमदनगरचे, तर सांगली, बुलडाणा आणि जळगाव येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.

हेही वाचा : बुलडाण्यात ‘क्वारंटाईन’ दरम्यान मृत्यू झालेल्या ‘त्या’ व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, राज्यात कोरोना बळींची संख्या 8 वर

एका 40 वर्षीय महिलेचा काल केईएम रुग्णालयात तीव्र श्वसनावरोधामुळे मृत्यू झाला होता. ती कोरोनाबाधित असल्याचे आज निष्पन्न झाले. तिला उच्च रक्तदाबही होता. बुलडाणा येथे एका 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू कोरोनामुळे झाला. तो मधुमेही होता. राज्यातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या आता आठ झाली आहे. 35 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई319723741026
पुणे (शहर+ग्रामीण)5117938250
पिंपरी चिंचवड मनपा230347
ठाणे (शहर+ग्रामीण)
31963642
नवी मुंबई मनपा20688032
कल्याण डोंबिवली मनपा941918
उल्हासनगर मनपा1803
भिवंडी निजामपूर मनपा98113
मिरा भाईंदर मनपा4751575
पालघर 12013
वसई विरार मनपा59710515
रायगड43155
पनवेल मनपा36012
नाशिक (शहर +ग्रामीण)25222
मालेगाव मनपा72144
अहमदनगर (शहर+ग्रामीण)77365
धुळे1189
जळगाव 418141
नंदूरबार 322
सोलापूर6234142
सातारा31435
कोल्हापूर 26721
सांगली83291
सिंधुदुर्ग1020
रत्नागिरी16724
औरंगाबाद12861448
जालना630
हिंगोली 13210
परभणी241
लातूर 8283
उस्मानाबाद 3730
बीड320
नांदेड 98‬4
अकोला 4201417
अमरावती 18214
यवतमाळ 115220
बुलडाणा 4183
वाशिम 80
नागपूर475847
वर्धा 601
भंडारा1400
गोंदिया 4310
चंद्रपूर2410
गडचिरोली1500
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)51012
एकूण52667157861695

(Corona Patient found in Baramati)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *