Uddhav Thackeray : मुंबई-नागपूर जोडणारी बुलेट ट्रेन द्या, मला आनंद होईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

"मुंबई-नागपूर जोडणारी बुलेट ट्रेन द्या, मला आनंद होईल", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'सामना' वृत्तपत्रातील मुलाखती दरम्यान सांगितले (CM Uddhav Thackeray Saamana interview).

Uddhav Thackeray : मुंबई-नागपूर जोडणारी बुलेट ट्रेन द्या, मला आनंद होईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : “मुंबई-नागपूर जोडणारी बुलेट ट्रेन द्या, मला आनंद होईल”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ वृत्तपत्रातील मुलाखती दरम्यान सांगितले (CM Uddhav Thackeray Saamana interview). शिवसेना नेते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध आज (26 जुलै) प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन विषयावर आपले मत मांडले (CM Uddhav Thackeray Saamana interview).

उद्धव ठाकरे म्हणाले, “मुंबई-नागपूर जोडणारी बुलेट ट्रेन द्या, मला आनंद होईल. राज्य म्हणून बुलेट ट्रेनची आवश्यकता असेल तर मी म्हणेन, माझ्या मुंबई-नागपूरला जोडणारी बुलेट ट्रेन द्या. माझी राजधानी आणि उपराजधानी जोडणारी ट्रेन द्या. जेणेकरुन विदर्भाच्या मनात कारण नसताना जो दुरावा करुन दिला जाण्याचा प्रयत्न केला जातो, तो दुरावा नष्ट होईल.”

“भूसंपादन करताना ज्यांचा विरोध झालाय त्यांच्या मागे शिवसेना आहे. शिवसेना पक्ष म्हणून ठाम उभी आहे. सरकार म्हणून जे काही करायचंय तो निर्णय आपण घेऊच, पण ज्यांचा ज्यांचा विरोध आहे, त्यांच्या मागे शिवसेना आहे. आता काही जणांनी स्वत:हून जमीन दिली असेल तर काय करणार”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

“ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांचा अजूनही जमिनी देण्यास विरोध आहे. त्यांच्यामागे शिवसेना ठाम उभी आहे. जसा नाणारचा विषय आहे. नाणारचासुद्धा सरकारने करार केलाच होता, पण तो जनतेने हाणून पाडला. आम्ही शिवसेना म्हणून जनतेच्या सोबत उभे राहिलो. आता सगळ्यांना मान्य असेल तर सरकार म्हणून करु करार. पण मधले दोन-तीन महिने आपले कोरोनामध्ये गेले. त्यामुळे सगळे विषय मागे पडले.”, असंही यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“250-300 कोटी मी का द्यावे. मुंबई-सूरत बुलेट ट्रेनमधून काही फायदा होणार आहे का? दाखवा आम्हाला, काय होणार फायदा? किती मुंबईतून आणि सूरतमधून ये-जा होणार आहे? किती आर्थिक घडामोड होणार आहे? हे सरकार म्हणून मला माहिती मिळू द्या. जर पटली तर जनतेसमोर ठेवतो, पण एखादी भूमिका मी एकतर्फी घेतली असेल आणि आता अयोग्य वाटत असेल तर तो प्रकल्प मी रद्द करेन.”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

“बुलेट ट्रेनचा विषय बॅकसीटला गेला, त्यावर काही चर्चा झालेली नाही. कोणी विचारपूस करत नाही. यावरही आता सरकार म्हणून निर्णय घेताना राज्याच्या हिताचा विचार करुनच निर्णय घ्यावा लागतो. पण राज्याच्या हिताचा विषय येईल, त्यावेळी यात हित आहे की नाही याचा विचार करावा लागेल. माझे मत असे आहे की, सगळ्यांना एकत्र बोलावून आपल्याला हा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.”, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

संबंधित बातम्या : 

सरकार तीनचाकी रिक्षाच, स्टिअरिंग माझ्याकडे, दोघे पाठी

हिंमत असेल तर सरकार पाडा” मुख्यमंत्र्यांचं भाजपला आव्हान, फडणवीसांनाही टोला

Uddhav Thackeray Interview | शरद पवारांनंतर आता संजय राऊतांचा उद्धव ठाकरेंशी ‘सामना’

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI