Sushant Singh Rajput | अब शहर भर जिक्र मेरी खुदकुशी का.. संजय राऊत-उद्धव ठाकरेही हळहळले

Namrata Patil

|

Updated on: Jun 14, 2020 | 4:23 PM

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर राजकीय नेत्यांनीही हळहळ व्यक्त (Political leader Tweet About Sushant Singh Rajput Suicide) केली.

Sushant Singh Rajput | अब शहर भर जिक्र मेरी खुदकुशी का.. संजय राऊत-उद्धव ठाकरेही हळहळले
Follow us

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड कलाकारांसह राजकीय नेत्यांनीही हळहळ व्यक्त केली. सुशांत सिंह राजपूतच्या निधनाबद्दल ऐकून धक्का बसला. खूप दु:ख झालं, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली. (Political leader Tweet About Sushant Singh Rajput Suicide)

“सुशांत सिंह राजपूतच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. खूप दु:ख झालं. देव, त्याच्या कुटुंबियांना, चाहत्यांना आणि प्रियजनांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो,” असे ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुशांतला श्रद्धांजली वाहिली.

“पूछा न जिंदगी में किसी ने भी दिल का हाल.. अब शहर भर में ज़िक्र मेरी खुदकुशी का है।” अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत दिली.

“हे योग्य नाही,” अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी ट्विटवर दिली.

“सुशांत सारख्या तरुण कलाकारांनी अशाप्रकारे पाऊलं उचलणं धक्कादायक आहे, त्याच्या आत्म्यास शांती लाभो,” अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली.

पियुष गोयल यांची प्रतिक्रिया

सुशांत सिंग राजपूत सारख्या हरहुन्नरी कलाकाराने यशोशिखरावर असताना आत्महत्या करावी हे न उलगडणारं कोड आहे.सुशांत यांच्या आकस्मित निधनामुळे चित्रपट सृष्टीने अतिशय गुणवान कलाकार गमावला आहे.मी व माझे कुटुंबीय राजपूत कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.भावपुर्ण श्रद्धांजली!, अशी पोस्ट मंत्री छगन भुजबळ यांनी ट्विटरवर केली.

“अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्युची बातमी ऐकून काळजाला धक्का बसला. कमी कालावधी मध्ये कलाविश्वात आपल्या उत्तम अभिनयाने यशाच्या शिखरावर पोहचलेला एक हरहुन्नरी कलाकार, टिव्ही सीरियल ते महेंद्रसिंह धोनी बायोपिक हा चित्रसृष्टीतील प्रवास. भावपूर्ण श्रद्धांजली,” अशी प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी दिली.

(Political leader Tweet About Sushant Singh Rajput Suicide)

संबंधित बातम्या :

Sushant Singh Rajput suicide | सुशांतच्या आत्महत्येचं वृत्त धोनी पचवू शकेल का? धोनीच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा

Sushant Singh Rajput | सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या, शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं?

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI