मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली ‘फिव्हर क्लिनिक’ संकल्पना नेमकी काय?

मुंबई महापालिकेतर्फे अनेक ठिकाणी फिव्हर क्लिनिक उघडण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती (Fever Clinic in Mumbai) दिली.

मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली 'फिव्हर क्लिनिक' संकल्पना नेमकी काय?

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला (Fever Clinic in Mumbai) आहे. सध्या तापमान बदलाच्या कारणाने अनेकांना सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास होत आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी खाजगी दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब, मेडिकल स्टोअर्स बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतर्फे अनेक ठिकाणी फिव्हर क्लिनिक उघडण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबतची घोषणा केली.

ज्यांना सर्दी, खोकला, ताप आहे त्यांच्यासाठी आम्ही लवकरच फिव्हर क्लिनिक (Fever Clinic in Mumbai) सुरु केले आहेत. त्या ठिकाणी आपली तब्येत दाखवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ताप, सर्दी, खोकला असणाऱ्या आणि कोरोना कोविड 19 सदृश लक्षणे असणाऱ्या व्यक्तींवर उपचार करण्यासाठी अधिकाधिक पर्याय उपलब्ध व्हावेत यासाठी पालिकेने हा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या सर्व विभांगामध्ये हे फिव्हर क्लिनिक सुरु होणार आहे. मुंबईतील 24 वॉर्डमध्ये हे क्लिनिक लवकरच सुरु होणार आहे.

या फिव्हर क्लिनिकमध्ये तीन भागात विभागणी केली असेल. त्यात निष्णात डॉक्टर उपचार करतील.

1. सौम्य लक्षण असणाऱ्यांसाठी
2. मध्यम आणि तीव्र लक्षण असणाऱ्यांसाठी
3. ज्यांना तीव्र लक्षणांसोबत इतर आजार आहेत त्यांच्यासाठी

‘या’ व्यक्तींसाठी फिव्हर क्लिनिक

यात ताप, सर्दी, खोकला अशी ‘कोविड कोरोना 19’ची सौम्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींवर वैद्यकीय आणि आरोग्य विषयक औषध उपचार हे खाजगी दवाखान्यात होणार आहे. तर कोविड कोरोना 19’ ची लागण झाल्यासारखी लक्षणे असणाऱ्या व्यक्तींवर महापालिकेच्या दवाखान्यात किंवा महापालिकेने कोरोना विषयक उपचारांसाठी प्राधिकृत केलेल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येणार आहेत.

त्याशिवाय ठिकठिकाणी आरोग्य शिबीरांचं आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या क्लिनिकमध्ये फक्त ताप, सर्दी आणि खोकल्यावर उपचार करण्यात येणार असल्याचं महापालिकेने (Fever Clinic in Mumbai) सांगितलं.

संबंधित बातम्या :

सिस्टर्स, वॉर्डबॉय आणि निवृत्त सैनिकांनो, योद्धे व्हा, देशाला तुमची गरज : मुख्यमंत्री

केंद्राने जे दिलंय ते वाटतोय, पण केंद्राने सगळंच दिलंय असा गैरसमज नको : मुख्यमंत्री

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI