सोनिया गांधींनी फोनवर विचारलं, आमचे लोक सतावत तर नाहीत ना; उद्धव ठाकरेंच्या उत्तराने हशा
ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुरुवारी मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात ‘महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही’ या आघाडी सरकारच्या कार्यपुस्तिकेचे आज प्रकाशन करण्यात आले. | CM Uddhav Thackeray

आमच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालं यावर अजूनही विश्वास बसत नाही. दोन वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले. पण आमचं सरकार उत्तम चालले असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
- ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुरुवारी मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात ‘महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही’ या आघाडी सरकारच्या कार्यपुस्तिकेचे आज प्रकाशन करण्यात आले.
- या प्रकाशन सोहळ्याला महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासोबत फोनवर झालेल्या संभाषणाचा रंजक किस्सा उपस्थितांना सांगितला.
- महाविकासआघाडी भक्कम असून मी अधूनमधून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवरुन संपर्कात असतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
- काही दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांनी मला फोनवर ‘आमचे लोक सतावत तर नाहीत ना’ असा प्रश्न विचारला.
- त्यावर मी सोनियाजींना सांगितलं की, राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा चांगलं सहकार्य करतात.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
- राज्यात तीन पक्षांचं सरकार असलं तरी आमचा कारभार उत्तम चाललाय. तिन्ही पक्षांमध्ये आडमुठेपणा नाही, असं सांगतानाच राज्यावर राजकीय संकट येणार नाही, असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
- आमच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालं यावर अजूनही विश्वास बसत नाही. दोन वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले. पण आमचं सरकार उत्तम चालले असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
- या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार यांच्यासह महाविकासआघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.
- ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुरुवारी मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात ‘महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही’ या आघाडी सरकारच्या कार्यपुस्तिकेचे आज प्रकाशन करण्यात आले.










