1680 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसह चार योजनांचे उद्घाटन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादेत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर येणार आहेत. (Cm Uddhav Thackeray Will Visit Aurangabad District today For Water Supply Scheme Bhoomi Pujan)

1680 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसह चार योजनांचे उद्घाटन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादेत

औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर येणार आहेत. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पहिल्यांदाच ते मराठवाड्यातील विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1680 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसह चार मोठ्या योजनांचं उद्घाटन करण्यात येणार आहेत. (Cm Uddhav Thackeray Will Visit Aurangabad District today For Water Supply Scheme Bhoomi Pujan)

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आज औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. ते आज औरंगाबाद शहरातील चार मोठ्या विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत. गरवारे स्टेडियमवरील भव्य शामियान्यात हा उद्घाटन कार्यक्रम सोहळा रंगणार असून या कार्यक्रमाला फक्त 200 निमंत्रितांना प्रवेश मिळणार आहे. उध्दव ठाकरे यांच्या या दौऱ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री आज 1680 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसह चार महत्त्वांच्या योजनेचं उद्घाटन करणार आहे. त्यामुळे या दौऱ्यात ते काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

श्रेयवादाची लढाई सुरू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये येण्याआधीच शिवसेना आणि भाजप दरम्यान या योजनेच्या श्रेयावरून वाद सुरू झाला आहे. 1680 कोटींच्या पाणीपुरवठा योजना तत्कालीन भाजप सरकारने मंजूर केल्याचा दावा भाजपने केला आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाने या योजनेला गती मिळाल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

>> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादकडे रवाना

>> 200 निमंत्रितांनाच प्रवेश

>> 70 स्क्रिन लावल्या

>> 1680 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन

>> हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे उद्घाटन

>> जंगल सफारी पार्कचे आभासी पद्धतीने उद्घाटन होईल

>> औरंगाबाद शहरातील रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ करणार

 

संबंधित बातम्या:

शेतकऱ्यांचा अपमान करणारे दानवे येडपट, भैताड; वडेट्टीवारांचा तोल सुटला

पवारांच्या यूपीए अध्यक्षपदासाठी महाराष्ट्राच्या दिग्गज काँग्रेस नेत्याचा पाठिंबा!

मिशन मुंबई, उद्धव ठाकरेंची सलग दुस-या दिवशी बैठक, शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत खलबतं

(Cm Uddhav Thackeray Will Visit Aurangabad District today For Water Supply Scheme Bhoomi Pujan)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI