आयत्या बिळावर नागोबा, रवी शास्त्रींनी अजिंक्य रहाणेचं मेलबर्न कसोटी विजयाचं क्रेडिट हिरावलं?

अक्षय चोरगे

|

Updated on: Dec 30, 2020 | 7:50 PM

बॉक्सिंग डे कसोटीत (Boxing Day Tets) टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) अनुपस्थितीत मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) संघाचे नेतृत्व केले.

आयत्या बिळावर नागोबा, रवी शास्त्रींनी अजिंक्य रहाणेचं मेलबर्न कसोटी विजयाचं क्रेडिट हिरावलं?

Follow us on

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Australia vs India 2nd Test) यांच्यात मेलबर्न ग्राऊंडवर (MCG) खेळवण्यात आलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत (Boxing Day Tets) टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) अनुपस्थितीत मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) संघाचे नेतृत्व केले. रहाणेने या दुसऱ्या कसोटीत आपल्या नेतृत्वाची चूणुक दाखवून दिली. तसेच रहाणेने योग्य वेळी योग्य निर्णय घेतले. रहाणेने आपल्याकडे असलेल्या गोलंदाजांचा योग्य आणि गरजेनुसार वापर केला. त्यामुळे टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाला दोन्ही डावात लवकर ऑल आऊट करण्यात यश आले. त्यासोबत दोन्ही डावात रहाणेने फलंदाज म्हणूनही उत्कृष्ट अशी कामगिरी केली. त्यामुळे या कसोटी विजयाचं श्रेय अजिंक्य रहाणेलाच जातं. परंतु रहाणेचं कसोटी विजयाचं श्रेय टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी हिरावलं असल्याचे बोलले जात आहे. (Ravi Shastri stole credit of team India’s Victory of Melbourne Test)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ अवघ्या 36 धावांवर बाद झाला. त्यामुळे जगभरातून भारतीय संघावर टीका होऊ लागली. टीम इंडिया ट्रोल होऊ लागली. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडू प्रचंड दडपणाखाली होते. त्यातच कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला. टीम इंडियाचे दोन प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा जायबंदी आहेत. विस्फोटक फलंदाज रोहित शर्मादेखील संघात नव्हता. अशा प्रतिकूल परिस्थितीत अजिंक्य रहाणेकडे संघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी आली. ही जबाबदारी त्याने नीट पार पाडली. तसेच संघाचे जबरदस्त नेतृत्व करुन संघाला विजय मिळवून दिला. परंतु या सामन्यातील विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाच्या विजयाचा हिरो अजिंक्य रहाणे अनुपस्थित होता. त्याच्याऐवजी संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री पत्रकार परिषदेला आले. त्यामुळे टीम इंडियाच्या आणि अजिंक्य रहाणेच्या चाहत्यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. चाहत्यांचा सवाल आहे की, जेव्हा जेव्हा टीम इंडिया अडचणीत असते, टीम इंडिया पराभूत होते तेव्हा प्रशिक्षक रवी शास्त्री पत्रकार परिषदेला उपस्थित राहात नाहीत. तर मग जेव्हा टीम इंडिया विजयी होते तेव्हा रवी शास्त्री पत्रकार परिषदेला का येतात? रवी शास्त्री मेनबर्न कसोटी विजयाचं श्रेय लाटण्यासाठी पत्रकार परिषदेला आले होते का?

अजिंक्य रहाणे टीम इंडियाचा केवळ हंगामी कर्णधार नसून मेलबर्न कसोटी विजयाचा हिरोदेखील आहे. त्यामुळे सामना जिंकल्यानंतर त्यानेच पत्रकार परिषदेला यायला हवं होतं. परंतु रहाणे या पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हता. साधारणपणे या पत्रकार परिषदेला कर्णधारानेच सामोरे जायला हवे, असा अलिखित नियमच आहे. केवळ कर्णधार दुखापतग्रस्त असेल तरच कर्णधार या पत्रकार परिषदेला अनुपस्थित असतात. रहाणे तर पूर्णपणे फिट आहे. तसेच सामन्यादरम्यान त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. तो संघासोबत सध्या सराव करतोय. तरीदेखील रहाणेऐवजी या पत्रकार परिषदेत रवी शास्त्रीच का आले? असा सवाल चाहत्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान अॅडलेड कसोटीत टीम इंडिया अवघ्या 36 धावांवर बाद झाली, त्यानंतर भारतीय संघाने तो सामना गमावला. त्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेला रवी शास्त्री का आले नाहीत.

रहाणेचं कमालीचं नेतृत्वकौशल्य

मेलबर्न कसोटीत, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. या सामन्यात गोलंदाज मोहम्मद सिराजने पदार्पण केलं. रहाणे सिराजला गोलंदाजीची संधी देईल, अशी आशा होती. मात्र रहाणेने सिराजचा पहिल्या सत्रात उपयोग केला नाही. अजिंक्यने पहिल्या सत्रात जसप्रीत बुमराह, उमेश यादव, रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजाकडून गोलंदाजी करुन घेतली. पहिल्या सत्रात खेळपट्टीकडून फिरकीपटूंना मदत मिळत होती. यामुळे रहाणेने जाडेजा आणि अश्विनला अधिक ओव्हर टाकायला दिल्या. सिराजला रहाणेने दुसऱ्या सत्रात चेंडू जुना झाल्यानंतर संधी दिली. जुना चेंडू सिराजने स्विंग केला आणि त्याला विकेट्सही मिळाल्या. दुसऱ्या सत्रात रहाणेने सिराजकडून जास्तीत जास्त षटकं गोलंदाजी करुन घेतली. रहाणेचे हे निर्णय योग्य ठरले. पहिल्या सत्रात टीम इंडियाला एकूण 3 विकेट्स मिळाल्या. यामध्ये जो बर्न्स, मॅथ्यू वेड आणि स्टीव्ह स्मिथचा समावेश होता. या 3 पैकी 2 विकेट्स फिरकीने घेतल्या. तर सिराजने दोन विकेट्स मिळवल्या. तसेच अश्विन गोलंदाजीसाठी आल्यानंतर रहाणेने खूप वेगळ्या प्रकारे फिल्ड सेट केलं होतं. त्यामुळे, अश्विनच्या फिरकीवर तीन फलंदाज बाद झाले. हे तीनही फलंदाज झेलबाद झाले.

हेही वाचा

रहाणेचं शतक म्हणजे विजयाची हमी, आकडेवारी हेच सांगते!

नगरच्या मातीची मेलबर्नमध्ये कमाल, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाने राहुल द्रविडची आठवण!

रोहित शर्मा तिसऱ्या कसोटीत खेळणार की नाही? मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीचं मोठं विधान

(Coach Ravi Shastri Takes Ajinkya Rahane Place in Post-match Conference raises question)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI