Corona | बीड जिल्ह्यातील 200 पेक्षा अधिक वऱ्हाडी मंडळींवर गुन्हा दाखल

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक निर्णय घेतले जात (Complaint against wedding beed) आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे.

Corona | बीड जिल्ह्यातील 200 पेक्षा अधिक वऱ्हाडी मंडळींवर गुन्हा दाखल


बीड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक निर्णय घेतले जात (Complaint against wedding beed) आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. मात्र काहींनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डावलले आहेत. त्यामुळे तब्बल 200 पेक्षा अधिक वऱ्हाडी मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात (Complaint against wedding beed) आला आहे.

शिरुरमध्ये विघनवाडी येथे झालेल्या लग्नातील तब्बल 200 वऱ्हाडी मंडळींवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर आष्टी तालुक्यातील केरुळ आणि जळगाव परिसरातील मंगल कार्यालयाच्या मालकांवर 188 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

माजलगावमध्ये ब्रह्मगाव याठिकाणी जमावबंदीचा आदेश डावलून लग्न सोहळा मोठ्या थाटात पार पडत होता. यादरम्यान पोलिसांनी याठिकाणी धाव घेत वधू आणि वर पित्यासह भटजी, फोटोग्राफर असे आठ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईने मात्र बाशिंग बांधून बहुल्यावर चढणारे चांगलेच धास्तावले आहेत.

जिल्ह्यात 19 मार्च रोजी वेगवेगळ्या ठिकाणी अनेक लग्न सोहळे पार पडले. यावर तात्काळ अॅक्शन मोडवर येत जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उचलला. शिरुर, आष्टी आणि माजलगाव या तीन तालुक्यात पार पडत असलेल्या लग्न सोहळ्यातील वऱ्हाडी मंडळीवर गुन्हे दाखल करण्यात आले.

दरम्यान, राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार अनेक निर्णय घेत आहेत. सध्या राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन 52 झाली आहे. तर काही संशयित रुग्णांवर डॉक्टरांच्या निगराणी उपचार सुरु आहेत. तर देशातही रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन 198 झाली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI