‘नाणार’वरुन राजन साळवी चक्रव्यूहात, विलास चाळके-राजन साळवी वाद चव्हाट्यावर

रिफायनरी समर्थन मेळाव्याला (Nanar Refinery controversy Rajan Salvi) गेलेल्या शिवसैनिकांवर कारवाई होणार असल्याचे संकेत शिवसेना कोकण संपर्कांनी दिलेत.

'नाणार'वरुन राजन साळवी चक्रव्यूहात, विलास चाळके-राजन साळवी वाद चव्हाट्यावर
Follow us
| Updated on: Mar 05, 2020 | 4:09 PM

रत्नागिरी : नाणार रिफायनरीच्या मुद्यावरुन शिवसेनेतील अंतरर्गत वाद उफळला आहे. रिफायनरी समर्थन मेळाव्याला (Nanar Refinery controversy Rajan Salvi) गेलेल्या शिवसैनिकांवर कारवाई होणार असल्याचे संकेत शिवसेना कोकण संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांनी दिलेत. तर दुसरीकडे रिफायनरीवरून शिवसेना जिल्हा प्रमुख विलास चाळके आणि आमदार राजन साळवी (Vilas Chalke vs Rajan Salvi) यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. रिफायनरी संदर्भात आमदार राजन साळवी (Nanar Refinery controversy Rajan Salvi) यांनी भूमिका सष्ट करण्याचं आव्हान जिल्हा प्रमुखांनी दिलं होतं. तर तब्बल 10 वर्ष काँग्रेसमध्ये असणाऱ्या जिल्हाप्रमुखांनी फुकटचे सल्ले देऊ नका असं सांगत आमदार राजन साळवींनी जिल्हा प्रमुखांना चोख उत्तर दिलं. पण या विधानावरून आमदार राजन साळवी अडचणीत आले आहेत.

आमदार राजन साळवींच्या या वक्तव्यानंतर वरिष्ठांकडून दखल घेतली गेली आहे. त्यामुळे वरिष्ठ आमदारांना या विषयी  जाब विचारणार आहोत, अशी माहिती शिवसेना कोकण संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांनी दिली. प्रकल्पाचं समर्थन आणि विरोधावरून राजकारण ढवळलं जातंय. शिवसैनिकांमध्येच दोन गट पडल्याने नाणारचा मुद्दा धुमसतोय. पण नाणार रिफायनरीच्या मुद्यावरुन इथले शिवसेनेचे स्थानिक आमदार राजन साळवी चक्रव्यूहात तर सापडले नाहीत ना अशी शंका उपस्थित होते आहे.  त्यामुळे नाणारच्या समर्थनावरुन शिवसेनेतच दोन गट पडल्याचं चित्र आहे.

नाणारच्या रिफायनरी प्रकल्पावरुन राजन साळवींचा अभिमन्यू तर होत नाही ना? नाणार रिफायनरीच्या समर्थकांवर कारवाई होतेय. शिवसेनेची सागवे जिल्हा परिषद गटाची कार्यकारणी बरखास्त झाली. मात्र हे सर्वच समर्थन राजन साळवी यांच्या गटाचेच आहेत. त्यामुळे रिफायनरीच्या विरोधातल्या सभेत सुद्धा शिवसेना आमदार राजन साळवी यांचा रिफायनरी विरोधातला भाषणातला पंच पहायला मिळाला नाही.

राजन साळवींना या मतदारसंघात मानणारा शिवसैनिक सुद्धा जो  नाणारला समर्थन करतोय तोच शिवसैनिक आपण आमदार राजन साळवींच्या बाजूने आहोत अशीच भूमिका घेतोय.

नाणार रिफायनरीच्या मुद्यावरुन शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्यावर दबाव असल्याचा आरोप सिंधुदुर्ग भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केला होता. तुम्ही आमच्यासोबत या, 2024 ची चिंता करु नका, आम्ही तुम्हाला आमदार बनवू, अशी हमी देत जठारांनी थेट राजन साळवींना नाणारच्या मुद्यावरुन घेरण्याचा प्रयत्न केला.

खरंच आमदार राजन साळवींची मुस्कटदाबी होतेय का? कारण राजन साळवी पहिल्यापासून कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. बाळासाहेबांच्या मर्जीतले म्हणून त्यांची ओळख. पण ‘मातोश्री’वरील सूत्रं कुणा वेगळ्याच्या हातात गेल्यानं नाणार रिफायनरी संदर्भात राजन साळवी यांना घेरण्याचे प्रयत्न सुरु झाल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.