नागपूरमध्ये काँग्रेसच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश, कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीमुळे काँग्रेसची सेनेवर नाराजी

नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीचं राजकारण सुरु झालं आहे (Congress upset on Shivsena in Nagpur).

नागपूरमध्ये काँग्रेसच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश, कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीमुळे काँग्रेसची सेनेवर नाराजी
Follow us
| Updated on: Sep 23, 2020 | 4:46 PM

नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीचं राजकारण सुरु झालं आहे (Congress upset on Shivsena in Nagpur). नुकतेच नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे महासचिव अंगद हिंदोरे यांच्यासह पूर्व नागपुरातील काँग्रेसच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना संपर्कप्रमुख आ. दुष्यंत चतुर्वेदी यांनी हे कार्यकर्ते फोडल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे यावर आता काँग्रेसने शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली आहे (Congress upset on Shivsena in Nagpur).

महाविकास आघाडीत तिन्ही पक्ष एकत्र आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या समन्वय समितने कार्यकर्ते फोडाफोडीबाबत निर्णय घ्यावा. काँग्रेसमध्ये पण इतर पक्षातून लोकं यायला तयार आहेत’, असं म्हणत काँग्रेस शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी फोडाफोडीवर नाराजी व्यक्त केली. याबाबत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी बोलणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

नुकतेच जुलै महिन्यातही अहमदनगरमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणावर शिवसेनेने नाराजी दर्शवली होती. या नगरसेवकांनी शिवसेना पक्षावर आणि पक्ष प्रमुखांवर नाराज नसून स्थानिक नेतृत्वावर नाराज असल्याचे सांगत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर शिवसेनेत घरवापसी केली होती.

संबंधित बातम्या :

महापालिका निवडणुकीतून माघार, नागपूरचे महापौर आता पदवीधर मतदारसंघाच्या शर्यतीत

संदीप देशपांडेंच्या खांद्यावर राज ठाकरेंचा हात, सविनय कायदेभंग आंदोलनानंतर मनसे नेते ‘कृष्णकुंज’वर

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.