AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात युती असली तरी औरंगाबादेत काँग्रेस स्वबळावर लढणार – अमित देशमुख

काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांचाही पक्षाने निवडणूक स्वबळावर लढावी, असा आग्रह आहे. आम्ही त्यांच्या मताचा आदर करायचे ठरवले आहे. | Congress Aurangabad mahanagarpalika election

राज्यात युती असली तरी औरंगाबादेत काँग्रेस स्वबळावर लढणार - अमित देशमुख
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Oct 15, 2020 | 3:43 PM
Share

औरंगाबाद: राज्यातील महाविकासआघाडी सरकारमधील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसकडून औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवली जाणार आहे. काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी यासंदर्भात माहिती दिली. महाविकास आघाडीतील पक्ष हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पहिल्यापासून स्वतंत्रपणे लढतात. त्यामुळे काँग्रेस औरंगाबाद महानगरपालिकेची आगामी निवडणुकही स्वबळावर लढेल, असे अमित देशमुख यांनी स्पष्ट केले. (Congress will fight Aurangabad mahanagarpalika election alone)

काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांचाही पक्षाने निवडणूक स्वबळावर लढावी, असा आग्रह आहे. आम्ही त्यांच्या मताचा आदर करायचे ठरवले आहे, असे अमित देशमुख यांनी सांगितले. कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने परिस्थिती सामान्य होऊ शकते. यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीची तारीख जाहीर केली जाईल.

कोरोनापूर्वी औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्यादृष्टीने भाजपने जिल्ह्यात जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनेकदा कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि छोटेखानी कार्यक्रमांसाठी औरंगाबादचे दौरे केले होते. त्यावेळी भाजपकडून औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा तापवण्याचा प्रयत्नही झाला होता.

दरम्यान, आता काँग्रेसच्या या निर्णयामुळे आगामी काळात महाविकासआघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रपणे लढवणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ते आतापर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील कुरबुरी अधूनमधून डोके वर काढत असतात. परंतु, वरिष्ठ नेत्यांमधील समन्वयामुळे आतापर्यंत महाविकासआघाडीचे गाडे सुरळीत चालले आहे. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकल्यास नवे वाद निर्माण होऊ शकतात. याशिवाय, गेल्या काही काळातील भाजपची वाढती ताकद पाहता मुंबई, नवी मुंबई, ठाणे या महानगरपालिकांमधील सत्ता कायम राखण्यासाठी तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे लढण्याची गरज आहे. मात्र, आता काँग्रेसच्या भूमिकेमुळे या सगळ्याविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

संबंधित बातम्या:

औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालंच पाहिजे : चंद्रकांत पाटील

रश्मी ठाकरेंच्या पहिल्याच ‘सामना’ अग्रलेखात भाजपवर हल्लाबोल

… तर मी स्वतः औरंगाबादला संभाजीनगर नाव द्यायला पुढाकार घेईन : इम्तियाज जलील

‘औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा’ भाजप नगरसेवकांचे काळे कपडे घालून सभागृहात प्रवेश

(Congress will fight Aurangabad mahanagarpalika election alone)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...