औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालंच पाहिजे : चंद्रकांत पाटील

औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झालंच पाहिजे," अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी (Aurangabad Name change demand) केली.

औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालंच पाहिजे : चंद्रकांत पाटील

औरंगाबाद : “छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे (Aurangabad Name change demand) आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. त्यामुळे औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झालंच पाहिजे,” अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन संघटनात्मक आढावा घेतला. यानंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटलांनी ही मागणी केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “औरंगाबादच्या नामांतरासंदर्भात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल असून, त्याला गती देऊन शहराचे नाव बदललेच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. औरंगजेब हा एक आक्रमणकारी होता. त्यामुळे या शहराचे नामांतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे (Aurangabad Name change demand) करावे.”

शेतकरी कर्जमाफीवरुनही चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टिकेची झोड उठवली. “नाचता येईना अंगण वाकडे अशी महाविकास आघाडी सरकारची स्थिती आहे. कर्जमाफीच्या नुसत्या घोषणा असून, प्रत्यक्षात अंमलबजावणी काही नाही. सरकारने 35 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली आणि केवळ 15 हजार जणांचीच यादी जाहीर केली. या गतीने संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कधी? असा सवाल चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला.

कर्जमाफीसाठी सरकार जर आचारसंहितेचं कारण देत असेल, तर कर्जमाफीसह थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीचा निर्णय रद्द, बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क रद्द करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय ही थांबवावा लागेल, असेही चंद्रकांत पाटील (Aurangabad Name change demand) यावेळी म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI