Corona Effect | देशातील आर्थिक विकास दर शून्याखाली जाण्याचा अंदाज, अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात

लॉकडाऊनचा सेवा क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. कारण बाजारातील मागणीतही 60 टक्क्यांची घट झाली आहे.

Corona Effect | देशातील आर्थिक विकास दर शून्याखाली जाण्याचा अंदाज, अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात
Follow us
| Updated on: May 22, 2020 | 11:37 PM

मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आता नोकऱ्या (Corona Effect On Jobs) धोक्यात आल्या आहेत. हळूहळू नोकऱ्या जात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. लॉकडाऊनचा सेवा क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. कारण बाजारातील मागणीतही 60 टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळेच ऑनलाईन फूड डिलेव्हरी करणाऱ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्यास सुरुवात (Corona Effect On Jobs) केली आहे.

स्विग्गीने 1 हजार कर्मचाऱ्यांना काढलं आहे. तर झोमॅटोनेही जवळपास 600 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. तसेच, जे कर्मचारी कामावर आहेत, त्यांच्या पगारात 50 टक्के कपात केली आहे. शिवाय, रीड अॅण्ड टेलर कंपनीने 1400 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकलं आहे. तिकडे टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या ओला कंपनीनेही 1400 कर्मचाऱ्यांना नारळ दिला. तर उबर कंपनीनेही जगभरात एक चतुर्थांश कर्मचाऱ्यांची कपात केली.

देशाचा जीडीपी शून्याच्या खाली जाण्याची शक्यता : आरबीआय

दुसरीकडे, देशाची आर्थिक परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्यक्त केली. 2020-21 या आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी शून्याच्या खाली जाण्याचा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात आरबीआयने नागरिकांना आणखी दिलासा देण्याचा प्रयत्न केला. (Corona Effect On Jobs)

आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कपात

आरबीआयने रेपो रेटमध्ये 40 बेसिस पॉईंटची कपात केली आहे. त्यामुळे आता रेपो रेट 4.4 टक्क्यांवरुन 4 टक्क्यांवर आला आहे. या कपातीमुळे कर्जावरील व्याज कमी होणार आहे. त्याचबरोबर कर्जाचा हफ्ता न भरण्याची मुभा आणखी 3 महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. आधी मार्च, एप्रिल, मेसाठी ही सवलत देण्यात आली होती. मात्र, आता ऑगस्टपर्यंत कर्जाचा हप्ता न भरण्याची मुभा देण्यात आली आहे.

कोरोनामुळे आर्थिक संकट तर जगभरात आलं आहे. त्याची झळ काही तीन चार महिन्यांपुरती नसेल. तर कोरोनामुळे आलेल्या मंदीचं सावट काही वर्ष तरी असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Corona Effect On Jobs

संबंधित बातम्या :

Aatma Nirbhar Bharat Package | संरक्षण क्षेत्र, कोळसा, खाणकाम, वीजनिर्मिती, हवाई क्षेत्राला पॅकेज

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.