AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरातील अतिरिक्त पोलीस आयुक्त निलेश भरणेंना कोरोनाची लागण

नागपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त IPS निलेश भरणे यांना कोरोनाची लागण झाली आहे (Corona infected IPS Nilesh Bharne Nagpur).

नागपुरातील अतिरिक्त पोलीस आयुक्त निलेश भरणेंना कोरोनाची लागण
| Edited By: | Updated on: Aug 26, 2020 | 8:01 AM
Share

नागपूर : नागपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त IPS निलेश भरणे यांना कोरोनाची लागण झाली आहे (Corona infected IPS Nilesh Bharne Nagpur). कर्तव्य बजावत असताना 19 अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच वरिष्ठ पोलीस निरिक्षक संतोष खांडेकर, वजीर शेख यांनाही कोरोनाची लागण झाली आहे (Corona infected IPS Nilesh Bharne Nagpur).

नागपूर पोलिसांचा आता कोरोनाशी लढा सुरु झालेला आहे. 31 तारखेपर्यंत पोलीस आयुक्त कार्यालयात भेट देणाऱ्यांना मनाई करण्यात आली आहे. सध्या पोलीस आयुक्त कार्यालयाचं निर्जंतूकीकरण सुरु केलं आहे.

नुकतेच नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण झाली. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली. “माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला कोणतीही लक्षण नाही, अशी माहिती मुंढेंना दिली. आपण नक्की जिंकू, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

नागपुरातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी अनेक मास्टरप्लॅन केले आहेत. तसेच कोरोना रुग्णांवर उपचारासाठी बेड उपलब्ध व्हावेत आणि या रुग्णांची कोणतीही लुटमार होऊ नये यासाठी तुकाराम मुंढे यांनी विशेष पथकाचं गठन केलं आहे. नागपुरातील खासगी रुग्णालयांवर महानगरपालिकेचा वॉच ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, नागपुरात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 22 हजार 225 वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यात 814 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यासोबत जिल्ह्यात एकूण 13 हजार 68 रुग्ण बरे झालेले आहेत.

संबंधित बातम्या :

Tukaram Mundhe | आपण नक्की जिंकू, आयुक्त तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण

नागपूरमधील खासगी रुग्णालयांवर पालिकेचा वॉच, तुकाराम मुंढेंकडून विशेष पथकाचं गठन

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...