खासगी रुग्णालयातील कोरोना विभागात वावर, नालासोपाऱ्यात 55 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण

नालासोपारा पश्चिमेकडील निलमोरे गावात 55 वर्षीय व्यक्तीला (Corona Patients found Nalasopara) कोरोनाची लागण झाली आहे.

खासगी रुग्णालयातील कोरोना विभागात वावर, नालासोपाऱ्यात 55 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण
Follow us
| Updated on: Mar 31, 2020 | 5:42 PM

नालासोपारा : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 237 वर पोहोचला (Corona Patients found Nalasopara) आहे. राज्यात आज दिवसभरात 17 नवे रुग्ण आढळले आहे. यात मुंबईत 5, पुणे आणि अहमदनगरमध्ये प्रत्येकी 3 नवे रुग्ण आढळले आहे. तर नवी मुंबई, डोंबिवली आणि बुलडाण्यात प्रत्येकी दोन रुग्णांची टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. यानंतर आता नालासोपाऱ्यातही कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे.

नालासोपारा पश्चिमेकडील निलमोरे गावात 55 वर्षीय व्यक्तीला (Corona Patients found Nalasopara) कोरोनाची लागण झाली आहे. हा व्यक्ती मुंबईतील खासगी रुग्णालयातील कामाला होता. या खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी विशेष कक्ष तयार करण्यात आले आहेत.

या विशेष कक्षाच्या परिसरात या व्यक्तीचा वावर होता. त्यामुळे त्याला कोरोनाची लागण झाली आहे. या व्यक्तीच्या घरात 3 जण आहेत.

याशिवाय हा व्यक्ती ज्या खासगी रुग्णालयात होता त्या ठिकाणी भीतीचे वातावरण पसरले आहे. या व्यक्तीवर त्याच रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

वसई विरार परिसरात 7 वा रुग्ण आढळल्यानंतर वसई विरार महापालिकेचे महापौर प्रवीण शेट्टी यांनी परिसरात जाऊन पाहणी केली. त्यानंतर तात्काळ परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

दरम्यान राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 220 वरुन 237 वर पोहोचला आहे. तर राज्यात आतापर्यंत दहा जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. मुंबईत 7, नवी मुंबई, पुणे आणि बुलडाण्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात कोठे किती रुग्ण?

मुंबई – 97 पुणे – 34 पिंपरी चिंचवड – 12 सांगली – 25 नागपूर –  16 कल्याण – 9 नवी मुंबई – 8 अहमदनगर – 8 ठाणे – 5 वसई विरार – 5 यवतमाळ – 4 पनवेल – 2 सातारा – 2 कोल्हापूर – 2 बुलडाणा – 3 पालघर- 1 उल्हासनगर – 1 गोंदिया – 1 औरंगाबाद – 1 सिंधुदुर्ग – 1 रत्नागिरी – 1 जळगाव- 1 नाशिक – 1 इतर राज्य (गुजरात) – 01

एकूण 241

संबंधित बातम्या : 

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 237 वर, मुंबई शंभरीच्या उंबरठ्यावर, धाकधूक वाढली

बारामतीच्या कोरोनाबाधिताची ओळख उघड, व्हॉट्सअॅप ग्रुप ॲडमिनसह तिघांवर गुन्हा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.