AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोंबिवलीत राजकीय कुटुंबाच्या लग्नात कोरोनाबाधित व्यक्ती, महापौरांसह नगरसेवकांनाही क्वारंटाईनचा सल्ला

कोरोनाबाधित तरुणाने निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादवी 188 प्रमाणे गुन्हा दाखल केला (Corona Positive Patient Political Marriage) आहे.

डोंबिवलीत राजकीय कुटुंबाच्या लग्नात कोरोनाबाधित व्यक्ती, महापौरांसह नगरसेवकांनाही क्वारंटाईनचा सल्ला
| Edited By: | Updated on: Mar 29, 2020 | 8:10 AM
Share

डोंबिवली : राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत (Corona Positive Patient Political Marriage) आहे. राज्यात आज दिवसभरात 21 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. मुंबईत 12, कल्याण डोंबिवली 2, पुणे 4, नागपूर 3, जळगावात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. यात डोंबिवलीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ही महिला आहे. विशेष म्हणजे तिने एका राजकीय कुटुंबातील लग्नाला हजेरी लावली होती. त्यामुळे डोंबिवलीत भीतीचे वातावरण पसरले आहे.

डोंबिवलीत 19 मार्चला एका राजकीय कुटुंबातील मुलाचे (Corona Positive Patient Political Marriage) लग्न होते. लग्नाच्या आदल्या दिवशी 18 मार्चला रात्री हळदीचा कार्यक्रम होता. या दोन्ही कार्यक्रमात 15 मार्चला तुर्कीहून आलेला नवरदेवाचा चुलतभाऊ सहभागी झाला होता. त्याला विमानतळावर होम क्वारंटाईनचा सल्ला दिला होता. मात्र तरीही हलगर्जीपणा दाखवत तो व्यक्ती हळदी आणि लग्न अशा दोन्ही सभारंभात सहभागी झाला. या लग्नात महापौर विनिता राणे यांच्यासह अनेक नगरसेवकदेखील उपस्थित होते.

या दोन्ही कार्यक्रमात हजारो संख्येने महिला, पुरुष, तरुण, तरुणी आणि लहान मुलंही उपस्थित होते. आता परदेशातून आलेला तरुण कोरोनाबाधित झाल्याने त्याच्यावर कस्तूरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

त्यानंतर आता या तरुणांच्या जवळच्या महिला नातेवाईकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. त्यामुळे डोंबिवलीत भीतीचे वातावरण पसरले आहे.

महापौर आणि नगरसेवकांना क्वारंटाईनचा सल्ला

कोरोनाबाधित तरुणाने निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादवी 188 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. एवढेच नाही तर लग्न समारंभाचे आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लग्न समारंभात सहभागी असलेल्या सर्वांना होम कोरोटाईनचा सल्ला देण्यात आला आहे. या लग्नात महापौर विनिता राणे यांच्यासह अनेक नगरसेवकदेखील उपस्थित होते.

कल्याण पूर्वेच्या आयर्लंडवरून आलेला एका तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर देखील उपचार सुरू आहेत. कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत 8 रुग्ण झाले (Corona Positive Patient Political Marriage) आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.