पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात, महानगरपालिका आयुक्तांचा दावा

एकिकडे पुण्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांचा आणि मृतांचा आकडा वाढत आहे. दुसरीकडे पुणे महानगरपालिका आयुक्तांनी पुण्याची परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे (Pune Commissioner on Corona situation).

पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात, महानगरपालिका आयुक्तांचा दावा
Follow us
| Updated on: May 30, 2020 | 5:41 PM

पुणे : एकिकडे पुण्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांचा आणि मृतांचा आकडा वाढत आहे. दुसरीकडे पुणे महानगरपालिका आयुक्तांनी पुण्याची परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे (Pune Commissioner on Corona situation). पुण्याचा मृत्यूदर 14 टक्क्यांवरुन 5 टक्क्यांवर आला आहे. तसेच पुढील 15 दिवसांनी हा दर साडेचार टक्के आणि त्यानंतर तो राज्याच्या बरोबरीने येईल, असा दावा आयुक्त शेखर गायकवाड यांनी केला आहे. त्याचबरोबर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 15 दिवसांवर गेला आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

जूनच्या शेवटपर्यंत पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या 7 हजारपर्यंत जाण्याची शक्यताही पुणे आयुक्तांनी वर्तवली आहे. ते म्हणाले, “मृत्यूदर रोखण्यासाठी महापालिका प्रशासनानं आता त्रिसूत्री धोरण हाती घेतलं आहे. त्यानुसार वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक, आजारी नागरिक आणि गरोदर महिलांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. प्रतिबंधित आणि प्रादुर्भाव असलेल्या भागात सध्या पाचव्यांदा तपासणी केली जात आहे. या तपासणीत मृत्यूदर रोखण्यावर विशेष लक्ष देण्यात आलं आहे. त्याचबरोबर रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण 15 दिवसांवर गेलं आहे. त्यामुळे सुरु असलेल्या उपाययोजना योग्य दिशेनं आहेत.

रुग्ण 15 दिवसांनी दुप्पट झाल्यानं 31 मे अखेर 9600 रुग्ण आणि 10 हजार निगेटिव्हचा अंदाज होता. त्यादृष्टीने 20 हजार रुग्णांची तयारी केली होती. मात्र प्रत्यक्षात आता केवळ 2500 रुग्ण झाले. त्यामुळे ही व्यवस्था जूनअखेरपर्यंत पुरु शकते, असं आयुक्तांनी म्हटलं. प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर निर्बंध शिथिल झाल्यानंतर रुग्ण वाढले आहेत. त्यामुळं वडार वस्ती, पांडवनगर या भागाचा पुन्हा कंटेनमेंट झोनमध्ये समावेश होईल. या व्यतिरिक्त पाटील वस्तीचा भाग ग्रीन झोनमध्ये जाईल. 5 ते 6 भाग आणि काही झोपडपट्ट्या वाढतील आणि एवढाच इतर भाग कमी होईल. त्यामुळं साधारण 64 ते 69 प्रतिबंधित भाग असण्याची शक्यता आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली. दरम्यान, पुण्यात मृत्युदर रोखण्यासाठी वयोवृद्ध, आजारी आणि गरोदर महिलांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग एक जूनपासून पुन्हा सुरु

Corona : पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, रुग्णांचा आकडा 7012 वर

Corona | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना

Pune Commissioner on Corona situation

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.