तोंडाचा वास घेण्याची भीती, ब्रेथ अॅनलायझरही नाही, ‘कोरोना’मुळे दारुडे ड्रायव्हर फोफावले

दारुचा वास घेण्यासाठी जवळ जावं लागत, तर ब्रेथ अॅनलायझर तोंडाजवळ लावलं जात असल्याने कोरोना पसरण्याची भीती पोलिसांना सतावते आहे Corona Breathalyzer Nagpur Police

तोंडाचा वास घेण्याची भीती, ब्रेथ अॅनलायझरही नाही, 'कोरोना'मुळे दारुडे ड्रायव्हर फोफावले
Follow us
| Updated on: Mar 18, 2020 | 3:48 PM

नागपूर : ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. नागपुरात ‘कोरोना’ व्हायरसच्या भीतीने ‘ड्रिंक अॅन्ड ड्राईव्ह’ची कारवाई बंद करण्यात आली आहे. ब्रेथ अॅनलायझर वापरण्याची सोय नाही आणि तोंडाचा वास घेण्याची भीती असल्यामुळे दारुडे ड्रायव्हर फोफावण्याची शक्यता आहे. (Corona Breathalyzer Nagpur Police)

‘ड्रिंक अॅन्ड ड्राईव्ह’ची कारवाई करण्यासाठी ब्रेथ अॅनलायझरचा वापर केला जातो. वाहनचालक दारु प्यायलेला आहे की नाही, हे तपासण्यासाठी मशिन प्रत्येकाच्या तोंडाला लावली जाते. त्यामुळे ‘कोरोना’चा प्रसार होण्याची भीती आहे.

दारुचा वास घेण्याचा प्रयत्न केला, तरी जवळ जावं लागत असल्याने तेही धोकादायक आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी ही कारवाईच बंद केली. ही कारवाई 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे.

दारु पिऊन कुणी वाहनचालक धुमाकूळ घालत असेल किंवा पोलिसांना वाहनचालक दारु प्यायल्याची शंका आल्यास ते त्याला थेट वैद्यकीय तपासणीसाठी पाठवणार आहेत. त्यामुळे दारु पिणाऱ्यांनी खुश होण्याचं कारण नाही. कारण पोलिसांच्या नजरेतून दारु पिऊन वाहन चालवणारे सुटत नाही.

पोलिसांना शंका आल्यास कारवाई केली जाणार असल्याने दारु पिऊन वाहन चालवू नका, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. (Corona Breathalyzer Nagpur Police)

संबंधित बातम्या 

Temples Closed | राज्यभरात देऊळ बंद, मंदिर परिसरात शुकशुकाट, कोणकोणती मंदिरं बंद?

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.