पहिला-दुसरा डोस, लसीसाठी कोणत्या ठिकाणी जायचं? मुंबईतील लसीकरण केंद्रांची इत्यंभूत माहिती

मुंबईत सोमवारी (26 जून) कोणकोणत्या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु आहेत, याबाबतची माहिती जारी करण्यात आली आहे (corona vaccination centers for first and second dose in Mumbai).

पहिला-दुसरा डोस, लसीसाठी कोणत्या ठिकाणी जायचं? मुंबईतील लसीकरण केंद्रांची इत्यंभूत माहिती
कोरोना लसीकरण

मुंबई : राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. संपूर्ण मुंबईत मोठ्या वेगाने लसीकरण सुरु आहे. मुंबई महापालिका दररोज आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर प्रत्येक दिवशी कोणकोणत्या लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरु आहे, कोणता डोससाठी लसीकरण सुरु आहे, याशिवाय त्याची नोंदणी कशी करावी, याबाबतची सविस्तर माहिती देते. मुंबईत सोमवारी (26 जून) कोणकोणत्या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु आहेत, याबाबतची माहिती देण्यात आली आहे (corona vaccination centers for first and second dose in Mumbai).

मुंबईतील 45 वर्षांपेक्षा जास्त वयोगटाच्या नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीचे 276 केंद्र

मुंबईत उद्या 45 वर्षांपेक्षा जास्त वयोगटाच्या नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस हा एकूण 276 केंद्रांवर मिळणार आहे. याबाबतची सविस्तर यादी ही मुंबई महापालिकेकडून जारी करण्यात आली आहे. या लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यासाठी 50 टक्के ऑनलाईन आणि 50 टक्के ऑफलाईन नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रांवर आरोग्य कर्मचारी किंवा फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना देखील दुसऱ्या डोसची सुविधा करण्यात आली आहे. पण दुसऱ्या डोससाठी पहिल्या डोसचे प्रमाणपत्र अनिवार्य असेल (corona vaccination centers for first and second dose in Mumbai).

18-44 वर्ष वयोगटातील नागरिकांच्या कोविशिल्ड लसीच्या पहिल्या डोससाठी 260 केंद्र

मुंबईत उद्या 260 केंद्रांवर 18-44 वर्ष वयोगटातील नागरिकांना कोविशिल्ड लसीच्या पहिला डोस घेता येणार आहे. हे लसीकरण केंद्र सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहतील. लसीसाठी 50 टक्के ऑनलाईन आणि 50 टक्के ऑफलाईन नोंदनी करता येणार आहे.

कोवॅक्सिन लस देणाऱ्या केंद्रांची यादी

मुबंई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत उद्या एकूण 29 केंद्रांवर कोवॅक्सिन लसीच्या दुसऱ्या डोससाठी लसीकरण केलं जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर 100 जणांचं लसीकरण केलं जाईल. या लसीकरणासाठी पहिल्या डोसचं प्रमाणपत्र आवश्यक असेल. तसेच लसीकरण केंद्र सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरु राहतील. विशेष म्हणजे सर्व केंद्रांवर थेट नोंदणी करता येणार आहे. ऑनलाईन नोंदणीची आवश्यकता नाही.

संबंधित बातम्या :

कोरोना रुग्णसंख्येत घट होऊनही महाराष्ट्रात निर्बंध का? तुमच्या सर्व शंकांची A to Z उत्तरे

दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी, डेल्टा प्लसचा धोका, निर्बंधात बदल, अकोल्यात काय सुरु काय बंद?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI