Corona cases in India | देशात आतापर्यंत 73 जणांना लागण, कोरोनाबाधितांमध्ये महाराष्ट्राचा दुसरा नंबर

सचिन पाटील

Updated on: Mar 12, 2020 | 4:21 PM

भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 73 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लोकसभेत (Corona cases in India) याबाबतची माहिती दिली.

Corona cases in India | देशात आतापर्यंत 73 जणांना लागण, कोरोनाबाधितांमध्ये महाराष्ट्राचा दुसरा नंबर

मुंबई : भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 73 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लोकसभेत (Corona cases in India) याबाबतची माहिती दिली. देशातील आकडा सत्तरीपार झाला असताना, इकडे महाराष्ट्राती कोरोनाबाधितांचा आकडा 11 वर पोहोचला आहे. केंद्र सरकार सातत्याने राज्यांशी संपर्क करुन, दररोज सविस्तर अहवाल मागवत आहे. याशिवाय भारत सरकारकडून परदेशातील भारतीयांनाही मायदेशी आणण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. (Corona cases in India)

देशात सर्वाधिक कोरोनाबाधित राज्यांमध्ये केरळचा पहिला नंबर लागतो. केरळमध्ये आतापर्यंत 17 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल महाराष्ट्राचा नंबर लागतो. महाराष्ट्रात 11, उत्तर प्रदेशात 10, दिल्ली 6 आणि कर्नाटकात चौघांना कोरोनाची लागण झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन म्हणाले, “देशातील 30 ते 40 हजार नागरिकांवर आमचं लक्ष आहे. केरळमध्ये सुरुवातीला कोरोनाचे रुग्ण आढळले, तेव्हापासून केंद्र सरकार राज्याच्या संपर्कात आहे. प्रत्येक राज्य दररोज संध्याकाळी आपला अहवाल केंद्राला पाठवतो”.

परदेशातून आलेल्या नागरिकांवर विशेष लक्ष आहे. स्क्रीनिंगमध्ये कोणतेही अडथळे नाहीत. 17 जानेवारीला दिल्ली-मुंबई, बंगळुरू, कोची यासारख्या विमानतळांवर स्कीनिंग सुरु होतं, मात्र आता 30 विमानतळांवर त्याची तपासणी होत आहे, असं हर्षवर्धन यांनी लोकसभेत सांगितलं.

देशभरात 51 लॅब  

कोरोना विषाणूची तपासणी साध्या लॅबमध्ये होत नाही, त्यासाठी देशभरात 51 लॅब तयार करण्यात आल्याचं डॉ. हर्षवर्धन म्हणाले. याशिवाय 56 जागांवर नमुने गोळा करण्यासाठी केंद्र बनवले आहेत. सरकारने एक पूर्ण लॅब आणि तज्ज्ञांना इराणला पाठवलं आहे, असंही हर्षवर्धन यांनी नमूद केलं.

परदेशी भारतीय

चीनमधून आतापर्यंत 645 भारतीयांना परत आणलं आहे. 7 मालदीवच्या नागरिकांनाही परत आणलं, जपान आणि इराणमधून भारतीयांना परत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं.

इराणमध्ये 6000 भारतीय

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही लोकसभेत निवेदन दिलं. इराणमध्ये आतापर्यंत 6 हजार भारतीय अडकले आहेत, यापैकी 1100 नागरिक हे महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीरमधील आहेत.

संबंधित बातम्या 

सॅनिटायझर नव्हे, कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी साबणच प्रभावी हत्यार

Corona | 15 एप्रिलपर्यंत परदेशी नागरिकांना भारत बंदी, सर्व व्हिसा रद्द, भारताचा मोठा निर्णय

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI