AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंगणघाटच्या हैवानासाठी रात्री 12.25 ला कोर्ट उघडलं, दहा मिनिटातील सुनावणीत काय घडलं?

हिंगणघाट येथील जळीतकांड प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी मध्यरात्रीच्या वेळीच न्यायालयासमोर हजर केलं.

हिंगणघाटच्या हैवानासाठी रात्री 12.25 ला कोर्ट उघडलं, दहा मिनिटातील सुनावणीत काय घडलं?
| Updated on: Feb 08, 2020 | 4:58 PM
Share

वर्धा : हिंगणघाट येथील जळीतकांड प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी मध्यरात्रीच्या वेळीच न्यायालयासमोर हजर केलं (Hinganghat case hearing). न्यायालयाने घटनेनंतर नागरिकांमधील संताप लक्षात घेता रात्री 12.25 वाजता या प्रकरणावर सुनावणी घेतली आणि आरोपीला 12 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. विशेष म्हणजे प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन न्यायाधीश इतक्या उशीरा सुनावणी होत असतानाही वेळेपूर्वीच न्यायालयात हजर राहिले.

हिंगणघाट येथे शिक्षिकेला जाळण्याचा प्रयत्न करणारा आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याला अगोदर 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून घटनेत वापरण्यात आलेलं साहित्यही जप्त केलं. यात मोबाईल, लायटर, कपडे, दुचाकी, शूज आणि पेट्रोलची छोटी बॉटल याचा समावेश आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीच्या सुरक्षा आणि दक्षतेच्या दृष्टीने त्याला जिल्ह्याच्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये नेत तपास केला. आता आरोपीला 20 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांनी दिली.

आरोपीला वर्धा, समुद्रपूर, सेलू, सेवाग्राम, देवळी या पोलीस स्टेशनला ठेवत मध्यरात्रीच न्यायालयात हजर करण्यात आलं. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही लक्ष घातलं आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देवळी येथे जाऊन स्वत: या प्रकरणाची कागदपत्रं तपासली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री 12.25 मिनिटांनी आरोपीला दिवाणी सहन्यायाधीश रत्नमाला डफरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आलं. 10 मिनिटे या प्रकरणाची सुनावणी चालली. यानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. संताप आणणाऱ्या या घटनेनंतर वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कोणीही आरोपीचं वकीलपत्र न भरण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर न्यायालयाने नियमानुसार विधी सेवा प्राधिकारणामार्फत आरोपीला वकील दिला. त्या वकिलाने आपले वकीलपत्र परत घेतल्याचीही माहिती पुढे येत आहे. आज आरोपीकडून कोणताही वकील उभा न झाल्यानं आरोपीची बाजू मांडली गेली नाही.

अशा प्रकरणात ओळख परेड हा महत्वाचा भाग असतो. पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीची नियमानुसार ओळख परेड केली जाऊ शकत नसल्याने आता कारागृहात आरोपीची ओळख परेड केली जाणार आहे. या प्रकरणात सर्व सरकारी पंच घेण्यात आले असून त्यांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलं आहे.

Hinganghat case hearing

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.