गर्भवती आणि दुर्धर आजार असलेल्या महिलांना ‘वर्क फ्रॉर्म होम’ची मुभा द्या, यशोमती ठाकूर यांची मागणी

50 वर्षांहून अधिक वयाच्या शासकीय महिला अधिकारी-कर्मचारी, गर्भवती महिलांना कोव्हिड 19 चा धोका जास्त (Pregnant Women get permission for Work from Home) असतो.

गर्भवती आणि दुर्धर आजार असलेल्या महिलांना 'वर्क फ्रॉर्म होम'ची मुभा द्या, यशोमती ठाकूर यांची मागणी
Namrata Patil

|

Jul 05, 2020 | 12:34 AM

मुंबई : रक्तदाब, मधुमेह, किडनीशी संबंधित आजार, हृदयविकार, श्वसनविकार इत्यादी आजार असलेल्या 50 वर्षांहून अधिक वयाच्या शासकीय महिला अधिकारी-कर्मचारी, गर्भवती महिलांना कोव्हिड 19 चा धोका जास्त असतो. त्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट मिळावी. तसेच त्यांना घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी महिला आणि बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. (Pregnant Women get permission for Work from Home demand Minister Yashomati Thakur)

यासंदर्भात राजपात्रित अधिकारी महासंघाने ॲड. ठाकूर यांना निवदेन दिले होते. त्या अनुषंगाने ॲड. ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

कोव्हिड 19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक गर्भवती महिला अधिकारी आणि कर्मचारी मूळ गावी गेल्या आहे. तसेच लॉकडाऊन संदर्भातील आदेशामुळे वाहतुकीचे निर्बंध असल्यामुळे त्यांना कार्यालयात उपस्थित राहणे शक्य झालेले नाही.

तर 50 पेक्षा जास्त वय असलेल्या उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनीशी संबंधित विकार, हृदयविकार, फुप्फुस आणि श्वसनशी संबंधित आजार असलेल्या व्यक्तींना कोव्हिडचा धोका निर्माण होते. यामुळे धोकादायक स्थिती निर्माण होण्याची अधिक शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

त्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारनेही या गटातील शासकीय महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्यापासून सूट द्यावी. खूपच अत्यावश्यक असेल तर त्यांना त्यांच्या घराजवळच्या कार्यालयात उपस्थित राहत काम करण्याच्या पर्यायावर विचार करावा. तसेच घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी मंत्री ॲड. ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. (Pregnant Women get permission for Work from Home demand Minister Yashomati Thakur)

संबंधित बातम्या : 

पवारांच्या सूचनांबाबत मुख्यमंत्र्यांनी ठरवावं, तिन्ही पक्ष एकत्र असल्याचं दिसत नाही : देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्री गाडीने, मग अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी?, भुजबळांचे चौकशीचे आदेश

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें