AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारामतीकरांनी संयमाचा ‘बारामती पॅटर्न’ दाखवावा, तालुक्यात पहिला ‘कोरोनाग्रस्त’ सापडल्यानंतर अजित पवारांचं आवाहन

कोणत्याही अफवांना बळी न पडता संयम राखत प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. आपल्या घरातच थांबून या विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत करावी, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. (Ajit Pawar appeals Baramati after First Corona Patient Found)

बारामतीकरांनी संयमाचा 'बारामती पॅटर्न' दाखवावा, तालुक्यात पहिला 'कोरोनाग्रस्त' सापडल्यानंतर अजित पवारांचं आवाहन
| Updated on: Mar 30, 2020 | 7:21 AM
Share

बारामती : बारामती शहरात ‘कोरोना’ विषाणूंचा संसर्ग झालेला एक रुग्ण आढळून आला आहे. कोणीही घराबाहेर न पडता संयमाच्या ‘बारामती पॅटर्न’चा आदर्श राज्यासमोर घालून देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तर कोणत्याही अफवांना बळी न पडता संयम राखावा, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. (Ajit Pawar appeals Baramati after First Corona Patient Found)

पुण्यातील ससून रुग्णालयात न्यूमोनियाचे उपचार घेणारा रुग्ण मूळ बारामतीचा आहे. उपचारादरम्यान त्याची ‘कोरोना’ चाचणी केली असता त्याला लागण झाल्याचं समोर आलं. पिंपरी चिंचवड धरून पुण्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 37 वर गेला आहे.

हे संकट आपल्या दारात आले असताना आपण घाबरुन न जाता या परिस्थितीचा संयमाने मुकाबला करावा. ‘कोरोना’चे संकट संपूर्ण जगावर घोंगावत आहे. आपल्या राज्यातही आलेले हे संकट आता आपल्या दारात आले आहे. बारामतीत सापडलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी तयार करण्याचे काम सुरु आहे. बारामतीतील काही परिसर सील करण्यात आला आहे, तसेच तातडीने निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.

या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार अत्यंत खंबीर पावले उचलत आहे. या संकटाचा विस्तार होऊ नये म्हणून आपण ‘लॉकडाऊन’चा पर्याय निवडला आहे. या संकटाला आपल्याला याच टप्प्यावर रोखायचे आहे. त्यासाठी कोणीही अनावश्यक घराबाहेर पडू नये. आपल्या बारामतीच्या पॅटर्नचा देशभारत लौकिक आहे, या लौकिकाला साजेसच या संकटाला आपण तोंड देऊया, असे आवाहन अजित पवारांनी केले.

कोरोनाचा बारामतीत प्रवेश, न्यूमोनियाचे उपचार घेणारा रुग्ण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

दरम्यान, या रुग्णावर तातडीने उपचार सुरु केले असून त्याच्याशी संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे. बारामती शहरात ज्या भागात ‘कोरोनाग्रस्त’ रुग्ण आढळला आहे, त्या भागातील वाहतूक वळवण्यापासून अन्य आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. पूर्ण परिसर निर्जंतुक करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात येत आहे, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. (Ajit Pawar appeals Baramati after First Corona Patient Found)

शहरातील समस्त नागरिकांना नम्र विनंती आहे, की कृपया कोणत्याही अफवांना बळी न पडता संयम राखत प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. सर्वांनी आपल्या घरातच थांबून या विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत करावी. गरज असल्याशिवाय घरातून कोणीही बाहेर पडू नये. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. आपण सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

(Ajit Pawar appeals Baramati after First Corona Patient Found)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.