अमरावतीत ‘हिंदू’ स्मशानभूमीतून बाळाचे पुरलेले प्रेत चोरीला

अमरावतीत ‘हिंदू’ स्मशानभूमीतून बाळाचे पुरलेले प्रेत चोरीला

अमरावती : अमरावतीमधील ‘हिंदू’ स्मशानभूमीतून नवजात बाळाचे पुरलेले प्रेत चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे. मृत बाळाचे वडील अमोल  नागपूरकर यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

नागपूरकर यांच्या एका दिवसाच्या बाळाचा 25 एप्रिल  रोजी  मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांनी रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी बाळाच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करुन हिंदू स्मशानभूमीमध्ये पुरले. त्यावेळी स्मशानभूमीतील कर्मचारीही तेथे उपस्थित होते. मात्र, काही दिवसांआधी हिंदू स्मशानभूमीतून अस्थी चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्यामुळे नागपूरकरांनी सहज आपल्या बाळाचा मृतदेह पुरलेल्या ठिकाणी पाहणी केली. त्यावेळी त्यांना धक्का बसला.

बाळाच्या मृतदेह पुरलेल्या ठिकाणी खड्डा खोदलेला होता आणि बाळाचा मृतदेह गायब होता. त्यांनी याबाबत हिंदू स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला. मात्र, त्यांना काहीही  उत्तर मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.


Published On - 11:29 am, Fri, 10 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI