Corona | मोदी सरकारचा मोठा निर्णय, कोरोनामुळे मृत्यू झाल्यास नातेवाईकांना 4 लाखांची मदत

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला चार लाख रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकारने जाहीर केली आहे.

Corona | मोदी सरकारचा मोठा निर्णय, कोरोनामुळे मृत्यू झाल्यास नातेवाईकांना 4 लाखांची मदत

नवी दिल्ली : जगभरासह भारतातही मोठ्या (Death Due To Corona Virus) प्रमाणावर पसरलेल्या कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी सरकार शक्य तो प्रत्येक प्रयत्न करत आहे. कोरोना विषाणूबाबत आता मोदी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला चार लाख (Death Due To Corona Virus) रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकारने जाहीर केली आहे.

हेही वाचा : इटलीत हनिमून, पतीला कोरोनाची लागण झाल्याचं समजताच पत्नीचा पोबारा

भारतात आतापर्यंत दोन जणांचा कोरोनामुळे (Death Due To Corona Virus) मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी 12 मार्चला कर्नाटकात कोरोनामुळे 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

तर, शुक्रवारी दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयात 68 वर्षांच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महिलेल्या तिच्या मुलामुळे कोरोनाचा संसर्ग झाला होता. या महिलेचा मुलगा 5 ते 22 फेब्रुवारी दरम्यान स्वित्झर्लंड आणि इटलीच्या दौऱ्यावर होता. सध्या महिलेच्या मुलाचा उपचार सुरु आहे.

आकडेवारीनुसार, भारतात एकूण 85 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यापैकी, 10 जणांमध्ये उपचारानंतर सुधारणा झाली आहे आणि 73 लोक अद्याप कोरोनाबाधित असल्याची माहिती आहे.

जगभरात कोरोनामुळे 5 हजार जणांचा मृत्यू

जगभरात आतापर्यंत 1,45,000 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं (Death Due To Corona Virus) आहे. तर जवळपास 5 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

संबधित बातम्या :

Corona | मुंबई, पुणे, नागपुरात जिम, थिएटर आणि मॉल बंद

CoronaVirus : रुग्णांचा कोरोनाशी यशस्वी लढा, भारतात उपचारानंतर 11 जण ठणठणीत बरे

देशात कोरोनाचा दुसरा बळी, दिल्लीत 69 वर्षीय महिलेचा मृत्यू

Corona Virus | सुट्टी, कार्यालयीन कामकाजाबाबतचे केंद्राचे ‘ते’ परिपत्रक खोटे

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI