AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गर्भवतीचं पोट फाडून बाळाचं अपहरण’, अमेरिकेत 67 वर्षांनी पहिल्यांदाच महिलेला मृत्युदंडाची शिक्षा

अमेरिकेत तब्बल 67 वर्षांनी एखाद्या महिलेला मृत्युदंडाची शिक्षा देण्याची घटना घडत आहे. या महिलेला 8 डिसेंबर रोजी इंजेक्शन देऊन मृत्युदंडाची शिक्षा दिली जाणार आहे.

'गर्भवतीचं पोट फाडून बाळाचं अपहरण', अमेरिकेत 67 वर्षांनी पहिल्यांदाच महिलेला मृत्युदंडाची शिक्षा
| Updated on: Oct 20, 2020 | 6:20 PM
Share

वॉशिंग्टन : अमेरिकेत तब्बल 67 वर्षांनी एखाद्या महिलेला मृत्युदंडाची शिक्षा देण्याची घटना घडत आहे. या महिलेला 8 डिसेंबर रोजी इंजेक्शन देऊन मृत्युदंडाची शिक्षा दिली जाणार आहे. अमेरिकेत शेवटी 1953 मध्ये एका महिलेला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली होती (Death penalty will be given to a woman after 67 in America US).

काय आहे प्रकरण?

लिसा माँटगोमेरी 2004 मध्ये कुत्रं खरेदी करण्याच्या बहाण्याने 23 वर्षीय बॉबी स्टीनेट यांच्या मिसोरी येथील घरी गेली. येथे लिसाने सर्वात आधी 8 महिन्यांची गरोदर असलेल्या स्टीनेटचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर लिसाने स्टीनेटचं पोट फाडून मुलाचं अपहरण केलं होतं.

पोलिसांनी पकडल्यानंतर लिसा माँटगोमरीने मिसोरीच्या न्यायालयात आपला गुन्हा कबूल केला. सुनावणीनंतर 2008 मध्ये न्यायालयाने अपहरण आणि हत्येच्या प्रकरणात तिला दोषी ठरवले. आरोपी लिसाच्या वकिलांनी सुनावणी दरम्यान, लिसा मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचा युक्तिवाद केला होता. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद अमान्य करत लिसाला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.

लिसा माँटोगोमेरीने यानंतर अनेक संघीय न्यायालयांमध्ये निकालाला आव्हान दिलं. मात्र, सर्व न्यायालयांनी तिची शिक्षा कायम ठेवली आहे. माँटोगोमेरीने वयाच्या 36 व्या वर्षी हे हत्याकांड केलं होतं. सध्या ती 52 वर्षांची आहे.

मागील 20 वर्षांपासून अमेरिकेत मृत्युदंडाच्या शिक्षेवर बंदी होती. नुकतीच 3 महिन्यांपूर्वी पुन्हा अमेरिकेत मृत्युदंडाला परवानगी मिळाली आहे. मृत्युदंडाची शिक्षा झालेली लिसा माँटगामेरी 9 वी कैदी आहे.

हेही वाचा :

अमेरिकेत भारतीय वंशाच्या अनिकाचं Covid-19 औषध बनवण्यावर संशोधन, 18 लाख रुपये जिंकले

Donald Trump | पराभव झाल्यास देश सोडून जावं लागेल, ट्रम्प यांची भावनिक साद

चीनचा भयानक प्लॅन! अमेरिकन नागरिकांचे डीएनए आणि मेडिकल डाटाही गोळा करण्याचं काम सुरु?

Death penalty will be given to a woman after 67 in America US

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.