प्रपोज डे : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी पत्नीला कसं प्रपोज केलं?

जगभरात सध्या 'व्हॅलेन्टाईन' आठवडा साजरा केला जात आहे. या आठवड्यातील आज 'प्रपोज डे' आहे (Delhi CM Arvind and Sunita Kejriwal love story).

प्रपोज डे : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी पत्नीला कसं प्रपोज केलं?

नवी दिल्ली : जगभरात सध्या ‘व्हॅलेन्टाईन’ आठवडा साजरा केला जात आहे. या आठवड्यातील आज ‘प्रपोज डे’ आहे. या ‘प्रपोज डे’च्या निमित्ताने दिल्लीचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले अरविंद केजरीवाल यांची लव्ह स्टोरी समोर आली आहे. केजरीवाल यांनी एका मुलाखतीत आपल्या लव्ह स्टोरीचा उलगडा केला आहे (Delhi CM Arvind and Sunita Kejriwal love story).

अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीचे नाव सुनीता आहे. दोघांच्या लव्ह स्टोरीला भारतीय महसूल सेवेच्या (IRS) प्रशिक्षणादरम्यान सुरुवात झाली. या ट्रेनिंगनंतर अरविंद आणि सुनिता यांची नागपुरातील राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथे पहिल्यांदा भेट झाली. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी होत राहिल्या. या दरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. काही दिवसांनी केजरीवाल यांनी सुनीता यांना थेट प्रपोज करत आपल्या मनातली गोष्ट सांगितली.

सुनीता यांना आपण कसं प्रपोज केलं? याविषयी सांगताना अरविंद केजरीवाल म्हणाले, “माझं प्रपोजल खूप साधं होतं. प्रपोजल ऐकल्यानंतर सुनीतानेही लगेच होकार दिला होता. आमच्यात पती-पत्नीच्या नात्याशिवाय घनिष्ठ मैत्री देखील आहे”.

अरविंद केजरीवाल आणि सुनीता यांना अभिनेता गोविंदाचे चित्रपट प्रचंड आवडतात. कॉलेजच्या दिवसांमध्ये ते दोघं एकत्र गोविंदाचे चित्रपट बघायला जायचे. “आम्ही गोविंदाचे जवळपास सगळीच चित्रपट बघितले आहेत”, असं केजरीवाल यांनी सांगितलं (Delhi CM Arvind and Sunita Kejriwal love story).

सुनीता केजरीवाल या एक जबाबदार महिला आहेत. त्यांनी आयआरएस अधिकारी म्हणूनही काही वर्ष जबाबदारी सांभाळली आहे. मात्र, अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आयआरएसच्या अधिकारपदाचा राजीनामा दिला होता. “मुख्यमंत्र्यांची पत्नी असणं ही एक अभिमानाची गोष्ट आहे. मात्र, पती मुख्यमंत्री झाल्यानंतर जबाबदारी वाढली. दोन्ही जबाबदाऱ्या पाळणं कठिण होऊन बसलं. त्यामुळे आयआरएस अधिकारीपदाचा राजीनामा द्यावा लागला”, अशी माहिती त्यांनी दिली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI