मेट्रो कर्मचाऱ्याची फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या, व्हिडीओ पाहून मित्राला धक्का

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम |

Updated on: Aug 12, 2019 | 11:22 AM

दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (DMRC) एका कर्मचाऱ्याने रविवारी फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली. शुभांकर चक्रवर्ती असं मृताचं नाव आहे. तो पश्चिम बंगालमधील 24 परगना जिल्ह्याचा रहिवासी आहे. तो दिल्लीतील शाहदरा भागात भाडेकरु म्हणून राहात होता.

मेट्रो कर्मचाऱ्याची फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या, व्हिडीओ पाहून मित्राला धक्का

नवी दिल्ली: दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (DMRC) एका कर्मचाऱ्याने रविवारी फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली. शुभांकर चक्रवर्ती असं मृताचं नाव आहे. तो पश्चिम बंगालमधील 24 परगना जिल्ह्याचा रहिवासी आहे. तो दिल्लीतील शाहदरा भागात भाडेकरु म्हणून राहात होता.

मृत शुभांकरच्या घरात कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. त्याने आपल्या घरात प्लास्टिकच्या तारेने पंख्याला फास घेत जीव दिला. शुभांकरचे दोन दिवसांपूर्वी वडिलांशी भांडण झाले होते. मात्र, त्याच्या आत्महत्येमागे हे भांडण कारण आहे की इतर काही याचा तपास सुरु आहे.

शुभांकरने फेसबुकवर केलेल्या लाईव्हमध्ये तो दिल्ली मेट्रोच्या आपल्या गणवेशात दिसत आहे. यात त्याने कुलरवर चढून दोनदा कॅमेराकडे पाहिले. तसेच फाशी घेण्याआधी कंपनीच्या ओळखपत्राचे चुंबन घेतले. शुभांकरने जुनमध्येच दिल्ली मेट्रोतील नोकरी सुरु केली होती. तो वीज देखभाल दुरुस्ती विभाग काम करत होता.

लाईव्ह व्हिडीओ पाहून मित्राने पोलिसांना कळवलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शुभांकरचा मित्र सूर्यकांत दासने सकाळी 8 वाजताच्या सुमारास शुभांकर आपल्या खोलीत पंख्याला फाशी घेऊन आत्महत्या करत असल्याचा लाईव्ह फेसबुक व्हिडीओ पाहिला. त्यानंतर त्याने सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी फर्श बाजार पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली.”

सूर्यकांतने या घटनेची माहिती आपला अन्य एक मित्र राजेंद्र ओझाला देखील दिली होती. त्यानंतर तो त्याच्या घरी पोहचला तर त्याची खोली आतून बंद होती. खिडकीतून पाहिले असता तो पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला. या घटनेनंतर मृताच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली आहे. शुभांकर विवाहत होता. त्याची पत्नी पश्चिम बंगालमध्ये राहते. त्याला एक बहिण असून ती विवाहीत आहे. आईचा 16 वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI