फ्रान्सचा मॉरीस कोंबडा नेहमीच बांग देतो, भाजपच्या गरूड भरारीपुढे टिकणार नाहीत, फडणवीसांचा नवाब मलिकांना अप्रत्यक्ष टोला

मुंबईः नवाब मलिक यांच्यावर आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलंच तोंडसुख घेतलं. नवाब मलिक यांचं नाव न घेता फडणवीस यांनी त्यांची तुलना फ्रान्सच्या एका कोंबड्याशी केली. हा कोबडा आधी फक्त सकाळी बांग देत होता. नंतर दुपारीही बांग देऊ लागला. त्यामुळे फ्रान्सचे लोक कोर्टात गेले होते, असा किस्सा सांगत देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या […]

फ्रान्सचा मॉरीस कोंबडा नेहमीच बांग देतो, भाजपच्या गरूड भरारीपुढे टिकणार नाहीत, फडणवीसांचा नवाब मलिकांना अप्रत्यक्ष टोला
देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडी व काँग्रेस नेत्यांना इशारा
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Nov 16, 2021 | 5:42 PM

मुंबईः नवाब मलिक यांच्यावर आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलंच तोंडसुख घेतलं. नवाब मलिक यांचं नाव न घेता फडणवीस यांनी त्यांची तुलना फ्रान्सच्या एका कोंबड्याशी केली. हा कोबडा आधी फक्त सकाळी बांग देत होता. नंतर दुपारीही बांग देऊ लागला. त्यामुळे फ्रान्सचे लोक कोर्टात गेले होते, असा किस्सा सांगत देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या सातत्याने वक्तव्य करण्यावर निशाणा साधला… मुंबईत दादरमधील वसंत स्मृती कार्यालयात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते.

काही कोंबडे दिवसभर चॅनलवर बांग देतात…

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘हल्ली काही कोंबडे दिवसभर चॅनलवर बांग देत असतात. आधी हा कोंबडे फक्त सकाळी बांग देत होते, पण आता दुपारीही बांग देतात. दिवसभर चॅनलवर त्यांचं बडबडणं सुरु असतं.’ गेल्या काही दिवसांपासून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे भाजपच्या विविध नेत्यांवर आरोप करत काही पुरावेही सादर करत आहेत. मलिकांच्या या सातत्यानं माध्यमांत झळकण्यावर देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केलं.

भाजपच्या गरूड भरारीपुढे कुणी टिकणार नाही

नवाब मलिक यांना अप्रत्यक्षरित्या कोंबडा म्हणतानाच देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा गरुडाची उपमा दिली आहे. हे करताना त्यांनी आणखी एक कथा सांगितली. गरूडाच्या पंखावर कावळा बसतो. गरूड पंख पसरून आकाशात झेप घेतो तेव्हा हे असे कावळे, डोमकावळे त्यांना चोची मारतात. पण गरुड त्यांच्याकडे लक्ष न देता एवढे मोठी गगनभरारी घेतो की, अशा डोमकावळ्यांना तेथे श्वासच घेता येत नाही. भाजपच्या मानेवर असे डोमकावळे कितीही बसले तरीही ते फार काळ टिकणार नाहीत, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

इतर बातम्या-

मालेगावची घटना हा प्रयोग, देशात अराजक माजवण्याचा हा डाव; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

धक्कादायक! प्रवचन देत असताना साधूला आला हार्ट अटैक, जागीच मृत्यू


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें