ओबीसी आरक्षणात वाटेकरी स्वीकारणार नाही; आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू: देवेंद्र फडणवीस

ओबीसींच्या आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरून त्याला तीव्र विरोध करू, असा इशारा भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला. (devendra fadnavis Oppose Additional Reservation In Obc Reservation For others)

ओबीसी आरक्षणात वाटेकरी स्वीकारणार नाही; आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू: देवेंद्र फडणवीस

मुंबई: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायलाच हवं. त्याबाबत दुमत नाही, असं सांगतानाच पण, ओबीसींच्या आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरून त्याला तीव्र विरोध करू, असा इशारा भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला. तसेच ओबीसी आरक्षणाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांची अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हानही त्यांनी दिलं. (devendra fadnavis Oppose Additional Reservation In Obc Reservation For others)

आज भाजपच्या ओबीसी कार्यकारिणीची बैठक पार पडली. या कार्यकारिणीला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी हा इशारा देतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मराठा समाजाला आरक्षण देताना आम्ही त्यात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का दिला जाणार नाही, याबाबतचं कलम टाकलं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. पण या कलमाला कोणतीही स्थगिती दिली नाही. या कलमाद्वारे आम्ही ओबीसी आरक्षणाला संरक्षण दिलं आहे, असं सांगतानाच कोणत्याही परिस्थितीत आम्ही ओबीसी आरक्षणात वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा, रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

अध्यादेश काढा

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. या आरक्षणात कुणालाही वाटेकरी केलं जाणार नाही, हे स्पष्ट करणारा अध्यादेश राज्य सरकारने काढावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

काँग्रेस-राष्ट्रवादीने भूमिका जाहीर करावी

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे. ओबीसी आरक्षणात कोणीही वाटेकरी नको. ही भाजपची अधिकृत भूमिका आहे. आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही ओबीसी आरक्षणाबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हानच त्यांनी यावेळी दिलं. ओबीसी आरक्षणावरून दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांमध्येच वेगवेगळ्या भूमिका असल्याची टीकाही त्यांनी केली. (devendra fadnavis Oppose Additional Reservation In Obc Reservation For others)

बाहेर आंदोलन, मंत्रिमंडळात गप्प

यावेळी फडणवीस यांनी ठाकरे सरकारमधील ओबीसी मंत्र्यांवरही टीका केली. ओबीसींना आरक्षण देण्याची मागणी करत ओबीसी मंत्री बाहेर आंदोलन करत आहेत. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत गप्प बसतात. काहीही करत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

ओबीसींचा मेळावा घेणार

ओबीसींचा विकास होणार नाही, तोपर्यंत राज्याचा विकास होणार ननाही. त्यामुळे ओबीसींची विकास झाला पाहिजे. येत्या काळात 346 ओबीसी घटकांचा मेळावा घेतला जाईल. येणारा काळ संघर्षाचा असल्याने ओबीसी मोर्चाची मोठी जबाबदारी असणार आहे, असं ते म्हणाले. भाजपमध्ये ओबीसींचं योगदान मोठं आहे. त्यामुळे भाजपला ओबीसींचा पक्ष म्हटलं जायचं असं सांगतानाच ‘सबका साथ सबका विकास’ हेच भाजपचं ध्येय असल्याचंही ते म्हणाले. (devendra fadnavis Oppose Additional Reservation In Obc Reservation For others)

 

संबंधित बातम्या:

ओबीसी आरक्षणाविरोधात कोर्टात याचिका, ओबीसी आरक्षण रद्द करण्याची सराटेंची मागणी  

SEBC म्हणजेच ओबीसी, हा प्रवर्ग जुनाच आहे : पी. बी. सावंत 

ओबीसी आरक्षण: भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना 5 वकिलांची नावं सुचवली  

(devendra fadnavis Oppose Additional Reservation In Obc Reservation For others)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI