AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात कोरोना लशीच्या वैद्यकीय चाचणीचा दुसरा आणि तिसरा टप्पा सुरु, DGCI कडून परवानगी

डीजीसीआयने या वैद्यकीय चाचणीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी परवानगी दिली आहे (DGCI approve testing of Corona vaccine).

देशात कोरोना लशीच्या वैद्यकीय चाचणीचा दुसरा आणि तिसरा टप्पा सुरु, DGCI कडून परवानगी
अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने कोरोना व्हायरस लस विकसित करणाऱ्यांना सांगितलं आहे की, प्रायोगिक लसीच्या आपत्कालीन वापरासाठी किमान दोन महिन्यांचा सुरक्षितता डेटा आवश्यक असणार आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला ते त्यांच्या लसीसाठी मान्यता देतील असं कंपन्यांकडून सांगण्यात आलं आहे.
| Updated on: Aug 03, 2020 | 4:39 PM
Share

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या वाढत आहे. दुसरीकडे कोरोनावरील लशीच्या वैद्यकीय चाचणीलाही वेग आला आहे. कोरोना लशीच्या चाचणीचा पहिला टप्पा अत्यंत वेगाने पूर्ण झाल्यानंतर आता पुढील टप्प्यातील चाचणीसाठी तयारी होत आहे (DGCI approve testing of Corona vaccine). नुकतीच डीजीसीआयने या वैद्यकीय चाचणीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी परवानगी दिली आहे (DGCI approve testing of Corona vaccine).

जगभरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संसर्गासोबतच कोरोना लसीचेही युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. याचाच भाग म्हणून भारतात ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) सिरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाला कोरोना लस वैद्यकीय चाचणीसाठी परवानगी दिली आहे. सिरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाला ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटीची कोरोना लस Astra Zeneca च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीसाठी परवानगी मिळाली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

मागील महिन्यातच ब्रिटेनच्या ऑक्‍सफर्ड यूनिव्हर्सिटीच्या कोविड-19 लशीचा पहिला आणि दुसरा टप्पा यशस्वी राहिला आहे. यातील चाचण्यांचा निकाल अनुकुल आला आहे. ब्राझिलमध्ये केल्या गेल्लाय मानवी चाचणीचे परिणाम सर्वाधिक चांगले आले आहेत. एप्रिलमध्ये याआधी पहिल्या टप्प्यातील मानवी चाचण्यांना सुरुवात झाली होती. या काळात जवळपास 1112 रुग्णांवर याचं परिक्षण करण्यात आलं. तिसऱ्या टप्प्यातील चाचणी साऊथ आफ्रिका आणि ब्राझिलमध्ये होणार आहेत. आता भारतात देखील तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या सुरु होणार आहेत.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

मागील काही दिवसांपासून देशभरात दिवसाला जवळपास 50 हजार लोकांना कोरोना संसर्ग होत असल्याचं समोर आलं आहे. देशात मागील 24 तासात 52,972 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 771 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण कोरोना पीडितांची संख्या 18 लाख 03 हजार 696 इतकी झाली आहे. आतापर्यंत एकूण 38,135 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 5 लाख 79 हजार 357 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. तसेच 11 लाख 86 हजार 203 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

हेही वाचा :

रशियातील कोरोना लसीच्या चाचणीचे तिन्ही टप्पे पूर्ण, जगात कुठे काय घडतयं?

Covaxin | कोवॅक्सिनचा पहिला टप्पा यशस्वी, 50 जणांवर चाचणी

DGCI approve testing of Corona vaccine

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.