AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video | ‘डॉगी’ला हवीय आठवडाभराची खुश्शाल झोप; धम्माल करमणूक करणारा व्हिडीओ पाहा

सोशल मिडियात व्हायरल होणाऱ्या कुत्र्यांच्या हटके, धम्माल व्हिडीओवरून कुत्र्यावर लोक किती प्रेम करतात, याची प्रचिती येते. (Doggy wants a good week’s sleep; Watch Dhammal Entertaining Video)

Viral Video | ‘डॉगी’ला हवीय आठवडाभराची खुश्शाल झोप; धम्माल करमणूक करणारा व्हिडीओ पाहा
‘डॉगी’ला हवीय आठवडाभराची खुश्शाल झोप
| Updated on: May 24, 2021 | 1:19 AM
Share

मुंबई : सोशल मीडियात हल्ली प्राण्यांचे व्हिडीओ फार लोकप्रिय ठरत आहेत. प्राण्यांच्या बऱ्याचशा हालचाली कॅमेऱ्यात टिपल्या जात आहेत. त्यांची छायाचित्रे आणि व्हिडीओ इतके मजेशीर आणि मनोरंजन करणारे असतात की काही क्षणांतच ते अनेक लोकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळेच तर सोशल मीडियातील प्राण्यांच्या अजबगजब व्हिडीओंची सोशल मीडियाच्या बाहेरील विश्वातही धम्माल चर्चा सुरू असते. हे मजेदार व्हिडिओ लोक त्यांच्या फोन आणि लॅपटॉपवर सेव्ह करतात. कारण हे व्हिडीओ एकदा पाहून आपले मन भरत नाही. असाच एक मजेदार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आपल्या सर्वांना हे माहित आहे की कुत्रा आपल्या जवळचा अर्थात दैनंदिन जीवनातील एक साथीदार आहे. तो माणसांच्या गोष्टी फार लवकर समजतो. कदाचित हेच कारण आहे की हा कुत्रा पाळीव प्राण्यांमध्ये पहिल्या पसंतीचा प्राणी असतो. (Doggy wants a good week’s sleep; Watch Dhammal Entertaining Video)

काय आहे व्हिडिओत

सोशल मिडियात व्हायरल होणाऱ्या कुत्र्यांच्या हटके, धम्माल व्हिडीओवरून कुत्र्यावर लोक किती प्रेम करतात, याची प्रचिती येते. आता हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपणही कुत्र्याच्या प्रेमात पडाल. या व्हिडिओमध्ये आपण पाहाल की एक कुत्रा पलंगावर स्वत:साठी चटई अंथरत आहे व शेजारी ठेवलेला टेबल फॅन चालू करून तो झोपी जात आहे. एवढेच नव्हे तर आपल्या झोपेत लाईटच व्यत्यय येऊ नये, अर्थात आरामदायी झोपेसाठी तो लाईट बंद करून झोपी जातो.

हा व्हिडिओ चेहऱ्यावरील टेन्शन दूर करेल

हा व्हिडिओ पाहताना असे दिसते की कुत्रासुद्धा माणसांप्रमाणेच आठवडाभरातील थकवा घालवण्यासाठीच झोपी जात आहे. त्याला पुरेशी विश्रांती हवी आहे व त्यात तो कोणत्याही प्रकारचा अडसर येऊ नये, याचीही पुरेशी काळजी घेत आहे. कुत्र्याचा हा अतिसुंदर व्हिडीओ सोशल मीडियात ट्विटरवर स्वीटी नावाच्या युजरने शेअर केला आहे. सध्या देश-विदेशात अर्थात जगात सगळीकडे कोरोना महामारीमुळे नैराश्येचे वातावरण आहे. अशा वातावरणात हा व्हिडीओ आपल्या चेहऱ्यावरील टेन्शन दूर पळवेल आणि निराशेतही चेहर्यावर हसू उमटवण्याची किमया करेल, यात तीळमात्र शंका नाही.

सध्या कोरोनाचा लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेकजण घरीच बसून आपली ऑफिसची कामे करताहेत. ही कामे करताना विरंगुळा कसा करायचा? करमणूक कशी करायची? असे प्रश्न पडले असतील तर तुम्ही प्राण्यांचे असे धम्माल व्हिडीओ नक्की पाहा व इतरांनाही शेअर करा. म्हणजेच काय, तुम्ही आनंद लुटा व इतरांच्याही चेहऱ्यावर आनंद उमटवा. (Doggy wants a good week’s sleep; Watch Dhammal Entertaining Video)

इतर बातम्या

Viral Video : फुटबॉलच्या मैदानात गायीचा धुडगूस, प्रोफेशनल खेळाडूप्रमाणे डिफेंडिंग स्किल, पहा रंजक व्हिडिओ

PHOTO | World’s Largest Aquariums : जगातील सर्वात मोठे आणि लोकप्रिय 5 मत्स्यालय

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.