मी स्वत: हून माझे जीवन संपवतोय, डोंबिवलीतील पतपेढीच्या मॅनेजरचा कार्यालयातच गळफास

डोंबिवलीत पतपेढी मॅनेजरने पतपेढी कार्यालयातच गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.(Dombivali Patpedhi Manager Commit suicide)

मी स्वत: हून माझे जीवन संपवतोय, डोंबिवलीतील पतपेढीच्या मॅनेजरचा कार्यालयातच गळफास

डोंबिवली : डोंबिवलीत पतपेढी मॅनेजरने पतपेढी कार्यालयातच गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. योगेश आरोटे (44) हे मॅनेजरचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. (Dombivali Patpedhi Manager Commit suicide)

डोंबिवलीजवळील ठाकुर्ली परिसरात असलेल्या सहकारमित्र मधूबन पतपेढी आहे. या पतपेढीत योगेश आरोटे या मॅनेजरचे काम करत होते. या पतपेढीच्या कार्यालयाची चावी ही त्यांच्याकडे असायची. आजही नेहमीप्रमाणे ते चावी घेऊन पतपेढीत आले. पतपेढीचे गेट उघडून ते आत बसले होते.

काही वेळानंतर पतपेढीतील एक कर्मचारी त्या ठिकाणी आला. त्यावेळी पतपेढीच्या एका रुममध्ये योगेश हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यानंतर त्या कर्मचाऱ्याने रामनगर पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी मनोहर घाडगे यांनी तातडीने पतपेढीत धाव घेतली. त्यांनी योगेश यांचा मृतदेह खाली उतरवून तपासणी केली असता त्यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली.

“मी स्वत: हून माझे जीवन संपवत आहे. यात कोणी दोषी नाही. माझा अंत्यविधी इथेच करणे,” असे त्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

योगेश यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन लहान मुलं असा परिवार आहे. सुसाईड नोट मिळाल्यानंतर पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.(Dombivali Patpedhi Manager Commit suicide)

संबंधित बातम्या : 

मालमत्तेचा वाद, एकाच कुटुंबातील 5 जणांची आत्महत्या, तिघांचे मृतदेह सापडले

सहा वर्षाच्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी घरी आणलं, नराधमाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Published On - 3:29 pm, Sat, 3 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI