Drugs Case | गांजा घेत असल्याची कबुली, कॉमेडियन भारती सिंहला अटक

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात आता कॉमेडियन भारती सिंहला अटक करण्यात आली आहे. (Bharati Singh arrested by NCB)

Drugs Case | गांजा घेत असल्याची कबुली, कॉमेडियन भारती सिंहला अटक
भरती केवळ एक चांगली कॉमेडियन नाही तर एक चांगली नर्तक देखील आहे. ‘झलक दिखला जा’ या डान्स बेस्ड रिअॅलिटी शोमध्ये तिच्या नृत्याची झलक पाहायला मिळाली होती.
Follow us
| Updated on: Nov 21, 2020 | 7:24 PM

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात कॉमेडियन भारती सिंहला (Bharti Singh) अटक करण्यात आली आहे. तिचा पती अभिनेता हर्ष लिंबाचीयाची (Harsh Limbachiyaa)  गेल्या पाच तासांपासून चौकशी सुरु आहे.  कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा पती अभिनेता हर्ष लिंबाचीयाला (Harsh Limbachiyaa) एनसीबीने ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास  भारतीला अटक करण्यात आली आहे.

या दोघांना NCB ने आधी  समन्स बजावले होते. NCB ने भारतीच्या घरी धाड टाकून झाडाझडती केली, त्यावेळी तिच्या घरी संशयित वस्तू सापडल्यानंतर NCB च्या अधिकाऱ्यांनी दोघांना शनिवारी सकाळीच ताब्यात घेतलं. मग संध्याकाळी चौकशीनंतर भारतीला अटक करण्यात आली आहे तर तिचा नवरा हर्षची चौकशी सुरु आहे.

गांजा घेत असल्याची कबुली…

एनसीबीने आज खार दांडा येथे कारवाई केली होती. या ठिकाणाहून एका 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे 15 बॉटल एल. एस. डी. हे ड्रग आणि 40 ग्राम गांजासह नेट्राझेपम हे ड्रग्स स्वरूपातील औषध ही सापडले आहे. या ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या व्यक्तीच्या चौकशीत कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष यांचे नाव उघडकीस आले.

यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी भारती हिच्या घरी धाड टाकली असता, तिच्या घरी 86.5 ग्राम गांजा सापडला. भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष या दोघांनीही ते गांजा घेत असल्याची कबुली दिली आहे. यानंतर भारती सिंग हिला एनडीपीएस कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे. तर, हर्ष याची चौकशी सुरू आहे. त्याच प्रमाणे इतर कारवाईत गुन्हा क्रमांक 33/20 मध्ये एनसीबीने मोठ्या प्रमाणात एमडी हे ड्रग्स जप्त केले आहे. एनसीबीने दोन फरार गुन्हेगारांना अटकही केली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधले ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे. यानंतर एनसीबीने धडक कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणी आणखी एका ड्रग्ज तस्कराला वर्सोवा-अंधेरी भागातून अटक करण्यात आली आहे (Drugs Case NCB Summons to Comedian Bharti Singh And Harsh Limbachiyaa).

गेल्या 2 आठवड्यांपासून एनसीबीने मुंबईतल्या अंधेरी, वर्सोवा, घाटकोपर या भागात धाड सत्र सुरू केले आहे. यामध्ये बॉलिवूडशी संबंधित अनेकांची नावे समोर आल्याने त्यांना समन्स बजावण्यात आले आहेत. एनसीबीने हर्ष-भारतीच्या घरावर छापा टाकला आहे. यानंतर त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत.

(Drugs Case NCB Summons to Comedian Bharti Singh And Harsh Limbachiyaa)

या आधी अर्जुन रामपालच्या घरावर धाड

सोमवारी (9 नोव्हेंबर) अर्जुन रामपालच्या घरावर आणि आसपासच्या परिसरावर एनसीबी पथकाने छापा टाकला होता. या धाडीत अर्जुन रामपालच्या घराची तपासणी करण्यात आली. या दरम्यान त्याच्या घरातून अनेक कागदपत्रे आणि वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. तब्बल 7 ते 8 तास हे धाडसत्र सुरू होते. त्यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी अनेक संशयास्पद वस्तू जप्त केल्या. यानंतर त्याला चौकशीसाठी हजर राहण्याबद्दल समन्स बजावण्यात आले होते. अर्जुनसह त्याची मैत्रीण गॅब्रिएला डेमेट्रियड्स हीची देखील चौकशी करण्यात आली होती (Drugs Case NCB Summons to Comedian Bharti Singh And Harsh Limbachiyaa).

निर्मात्याच्या घरात ड्रग्जचा साठा

8 नोव्हेंबर रोजी सकाळी निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली होती. यावेळी एनसीबीने 3 मोबाईलसह ड्रग्ज जप्त केले गेले. यानंतर नाडियाडवाला यांच्या पत्नीच्या अटकेची माहिती समोर आली. NCB च्या या कारवाईत फिरोज नाडियाडवाला यांच्या घरात एकूण 717.1 ग्रॅम गांजा, 74.1 ग्रॅम चरस आणि 95.1 ग्रॅम एमडी अमली पदार्थ सापडले होते. याची किंमत 3 लाख 66 हजार 610 रुपये आहे. यानंतर NCB च्या अधिकाऱ्यांनी शबाना सईद यांना त्यांच्या गुलमोहर क्रॉस रोडवरील घरातून घरातून अटक केली. तसेच, फिरोज यांची देखील चौकशी करण्यात आली.

एनसीबीने मालाड, अंधेरी, लोखंडवाला, खारघर, कोपरखैरणेमध्ये अनेक ड्रग्स पेडलर्सच्या ठिकाणांवर छापेमारी केली. या छापेमारीत 5 ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली होती. यातीलच एका ड्रग्ज तस्कराने चौकशीदरम्यान एनसीबीला फिरोज नाडियाडवाला यांचे नाव सांगितले होते(Drugs Case NCB Summons to Comedian Bharti Singh And Harsh Limbachiyaa).

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. तेव्हापासून एनसीबीकडून बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खोदण्याचे काम सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एनसीबी कारवाईत बॉलिवूडमधील अनेक बडे दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत.

(Drugs Case NCB Summons to Comedian Bharti Singh And Harsh Limbachiyaa)

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.