एकनाथ खडसे यांनाही वाढीव वीज बिलाचा शॉक, एका महिन्याचं बिल तब्बल…..

एकनाथ खडसे यांनाही वाढीव वीज बिलाचा शॉक, एका महिन्याचं बिल तब्बल.....
Eknath Khadse electricity bill

एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरातील घराचे वीजबिल भरमसाठ आले आहे. खडसे यांना 1 लाख चार हजाराचे बिल आले. Eknath Khadse electricity bill

सचिन पाटील

|

Aug 07, 2020 | 12:09 PM

जळगाव : राज्यभरात वीज बिलाच्या तक्रारींचा महापूर आला आहे. सततच्या तक्रारींनी राज्य सरकारचीही डोकेदुखी वाढली आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी जाहीररित्या वाढीव वीजबिलाबाबत रोष व्यक्त केला आहे. यामध्ये आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचाही समावेश झाला आहे. (Eknath Khadse electricity bill)

एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरातील घराचे वीजबिल भरमसाठ आले आहे. लॉकडाऊन काळात एकनाथ खडसे यांना 1 लाख चार हजाराचे बिल आल्याने, त्यांनी रोष व्यक्त केला आहे.

लॉकडाऊन काळात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून वाढीव बिलं येत आहेत. सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत. महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचे बिल अवास्तव आहे, ते न भरण्यासारखे आहे, असं खडसे म्हणाले. नागरिकांना येत असलेल्या अवास्तव बिलामध्ये सवलती, सूट द्या, अवास्तव बिलाच्या तपासण्या करा, अशी मागणी त्यांनी केली.

(Eknath Khadse electricity bill)

बिलामध्ये काहीतरी सवलती द्या. नागरिकांना वेठीस धरु नका, असं त्यांनी राज्य सरकारला सुनावलं आहे.

गायिका आशा भोसले यांना 2 लाखाचं बिल

प्रख्यात गायिका आशा भोसले यांनीही नुकतीच वीज बिलाबाबत तक्रार केली आहे. लोणावळ्यातील बंगल्याला दोन लाख आठ हजार रुपयांचे बिल आल्याची तक्रार भोसलेंनी केली आहे. (Asha Bhosle flags Rs 2 lakh power bill for June) आपल्याला जून महिन्याचे वीज बिल तब्बल 2 लाख 8 हजार 870 रुपये आल्याची तक्रार आशा भोसले यांनी ‘महावितरण’कडे केल्याचे वृत्त ‘इकोनॉमिक टाईम्स’ने दिले होते. लोणावळ्यात असलेल्या आशा भोसले यांच्या बंगल्याचे हे बिल आहे. मात्र हे बिल प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेऊन केल्याचा दावा ‘महावितरण’ने केला आहे.

(Eknath Khadse electricity bill)

संबंधित बातम्या 

Asha Bhosle | आशा भोसलेंना दोन लाखांचे वीज बिल, ‘महावितरण’चे उत्तर…  

Electricity Bill | 20 हजार कोटींच्या वसुलीसाठी वीज बिलं वाढवले, किरीट सोमय्यांची सरकारवर टीका   

Electricity Bill | वाढीव वीज बिल आकारणीला चाप बसायला हवा, राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें